Trending Viral Video: एक काळ असा होता जेव्हा मुलं पोलिसांचं नाव ऐकून घाबरायचे. मात्र आत्ताचा काळ असा आहे की स्वतः आई-वडिलच मुलांचे कारनामे पाहून थक्क होतात. अशीच एक घटना घडली आहे त्यात मुलंच पालकांची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेले आहेत. पालकांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील पोलिसांकडे केली आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक चिमुकला मुलगा पोलिस ठाण्यात पोहोचला आहे आणि पोलिसांकडे वडिलांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे.
मध्य प्रदेशच्या धार येथील एव व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक मुलगा पोलिस ठाण्यात बसलेला दिसतोय. तर मुलाच्या समोर पोलिस अधिकारी बसले आहेत. दोघांमध्ये बोलणं सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी मुलाचं नाव विचारल्यावर त्याने त्याचं नाव हसनैन असं सांगितलं आहे. तो त्याचे वडिल इकबाल यांची तक्रार करण्यासाठी पोहोचला आहे. चिमुकल्याची तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू रोखता आलं नाही.
चिमुकल्याने पोलिसांना म्हटलं की, त्याचे वडील त्याला रस्त्यावर फिरू देत नाहीत. नदी किनारी जाऊ देत नाहीत. म्हणून तो त्यांच्यावर नाराज आहेत. आश्चर्य म्हणजे, या चिमुकल्याने वडिलांवर कारवाईची मागणीही केली आहे. त्यांना जेलमध्ये बंद करा, असंही तो सांगतोय. मुलगा ज्या निरागसपणे वडिलांची तक्रार करत आहे ते ऐकून पोलिस ठाण्यातही एकच हशा पिकला होता. चिमुकल्याचा हा निरागसपणा पाहून सोशल मीडियावरही त्याचे चाहते झाले आहेत. या व्हिडिओवर एकापेक्षा एक भारी कमेंट आल्या आहेत.
मध्य प्रदेश के धार में 5 साल का बच्चा अपने ही पिता के खिलाफ रिपोर्ट दर्ज कराने थाने पहुंच गया।
पिता ने बच्चे को नदी में स्नान करने के लिए जाने से रोका और उसे डांटा।नाराज बच्चा पिता के खिलाफ रिपोर्ट दर्ज करवाने थाने पहुच गया।#Dhar pic.twitter.com/1HEYl5UZSS
— Suresh Singh (@sureshsinghj) August 20, 2024
मुलाचा हा व्हिडओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या वडिलांना फोन करुन नेमकं काय झालं असं विचारणा केली आहे. त्यावर उत्तर देऊन देऊन त्याचे कुटुंबीय थकले आहे. तर, एकीकडे सोशल मीडियावरदेखील या मुलाच्या धाडसाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. हा व्हिडिओ पाहून एका सोशल मीडिया युजरने म्हटलं आहे की, या मुलाची हिम्मत तर बघा कसं पोलिसांच्या समोर बसून वडिलांची तक्रार करतोय. तर, एकाने म्हटलं आहे की, मी असं ऐकलं आहे की आजकाल मुलं नव्हे तर थेट वडिलांचाच जन्म होतो. तर, तिसऱ्या युजरने म्हटलं आहे की, या वयात तर मी पोलिसांना पाहूनच लपून जायचो. तर एक हा आहे की मुलगा पोलिस ठाण्यात बसून बापाचीच तक्रार करतोय