नवी दिल्ली : आधार अनिवार्य न करण्याची मागणी होत आहे, बँक खातं आधारशी लिंक करण्यासाठी, मुदत वाढवून मार्च २०१८ करण्यात आली आहे, तर दुसरीकडे आधार गरजेचं न करण्याची मागणीही जोर धरत असल्याचं दिसत आहे
कार्यकर्त्यांचा एक समूह speakforme.in नावाची साईट लॉन्च केली आहे. या वेबसाईटद्वारे लोक आधार बेकायदेशीर गरजेची न करण्याची मागणी सरकारपर्यंत पोहचवू इच्छीत आहेत.
या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळतोय, ही वेबसाईट लॉन्च झाल्यानंतर ३ तासांच्या आत, १ हजारपेक्षा जास्त लोकांनी सरकारला मेल केले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार यात ७८० ईमेल्स हे फक्त आमदारांनी केले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार speakforme.in बनवणारा बंगळुरूचा IT प्रोफेशनल किरण जोन्नालगद्दाचं असं म्हणणं आहे की, बँक खातं, आणि मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर, जनतेला त्रासदायक एसएमएस आणि कॉल येतात.
आधारच्या तंत्रज्ञानाला सहज हॅक करता येऊ शकतं, यामुळे करोडो लोकांची माहिती धोक्यात येऊ शकते. किरण यांनी असं म्हटलं आहे की, या मुद्यांवर संसदेत चर्चा व्हावी.