Crime News: बंगळुरु रेल्वे स्थानकावर (Bengaluru Railway Station) एक ड्रम बेवारस स्थितीत पडला होता. काही प्रवाशांना शंका आल्याने त्यांनी फोन करुन पोलिसांना (Police) सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ड्रम तपासला असता एकच धक्का बसला. कारण या ड्रममध्ये एका महिलेचा मृतदेह (Dead Body) होता. ड्रममध्ये मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. महत्त्वाचं म्हणजे, एका वर्षात घडलेली ही दुसरी घटना आहे. याआधीही अशाच प्रकारे महिलेचा मृतदेह ड्रममध्ये सापडला होता.
Baiyappanahalli रेल्वे स्थानकावर हा मृतदेह सापडला आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेश गेटवर सकाळी 10 ते 11 च्या सुमारास हा ड्रम ठेवण्यात आला होता. हा ड्रम कपड्याने झाकण्यात आला होता. तसंच वरती झाकण ठेवण्यात आलं होतं. मृत महिलेचं वय 31 ते 35 दरम्यानचं आहे. तिची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांना तपास सुरु केला असता तीन लोकांनी हा ड्रम रेल्वे स्थानकावर ठेवला असल्याचं निष्पन्न झालं. ऑटोरिक्षातून आलेल्या तिघांनी हा ड्रम सोमवारी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावार ठेवला होता. दरम्यान मृतदेह Machlipatnam येथून ट्रेनने आणण्यात आला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी आपलं एक पथक Machlipatnam येथे पाठवलं होतं. पण महिलेची ओळख पटू शकली नाही असं बंगळुरु रेल्वे पोलीस अधिक्षक डॉक्टर सोमलथा यांनी सांगितलं आहे.
बंगळुरुत दोन महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. एका प्लास्टिक ड्रममध्ये 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. Yesvantpur रेल्वे स्थानकावर स्वच्छता कर्मचाऱ्यांना हा मृतदेह सापडला होता.