Air India offers VRS | एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेण्याची घोषणा केली आहे. आता 55 वर्षांवरील कर्मचारी आता व्हीआरएस घेऊ शकणार आहेत. याशिवाय 20 वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घेण्याचा पर्यायही असेल. यासह कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची वयोमर्यादा 55 वरून 40 करण्यात आली आहे.
VRS बाबत मोठी घोषणा
टाटा समूहाने गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी यशस्वी बोली लावल्यानंतर गेल्या वर्षी 27 जानेवारी रोजी एअर इंडियाचा ताबा घेतला होता. बुधवारी कर्मचार्यांना पाठवलेल्या पत्रात, एअरलाइनने म्हटले आहे की एअर इंडियाच्या विद्यमान नियमानुसार, कायमस्वरुपी कर्मचारी जर त्यांचे वय 55 वर्षे असेल आणि त्यांनी 20 वर्षे काम केले असेल तर ते व्हीआरएस घेऊ शकतात.
VRS साठी अर्ज करणाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन
एअरलाइनने म्हटले आहे की कंपनी अतिरिक्त फायदा म्हणून क्रू मेंबर्सची वयोमर्यादा 55 वर्षांवरून 40 वर्षांपर्यंत कमी करत आहे. त्यात म्हटले आहे की, '1 जून 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत VRS साठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकवेळच्या लाभाच्या रूपात अतिरिक्त प्रोत्साहनही दिले जाईल.
याशिवाय 1 जून ते 30 जून दरम्यान व्हीआरएससाठी अर्ज करणार्या कर्मचार्यांना प्रोत्साहनाव्यतिरिक्त अतिरिक्त सवलती मिळतील. कंपनीने म्हटले आहे की अर्ज स्वीकारणे हे व्यवस्थापनाच्या विचाराधीन असेल.
विमान कंपनीची ही घोषणा कंपनीच्या नवसंजीवनीसाठी असल्याचे मानले जात आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये एअर इंडियामध्ये 9426 कायमस्वरूपी कर्मचारी होते. व्हीआरएसच्या घोषणेनंतर कोलकाता, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये केबिन क्रूच्या मुलाखतीही सुरू आहेत.