अयोध्या : Aaditya Thackeray Ayodhya Visit : अयोध्या दौरा राजकीय नाही तर हा श्रद्धेचा विषय आहे. रामललाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ही रामराज्याची भूमी आहे. राजकारणाची नव्हे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लखनऊमधून अयोध्येकडे रवाना झालेत.त्यावेळी ते बोलत होते. लखनऊ विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून फुलांच्या पायघड्या घालून त्यांचं स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरेंचा आज अयोध्या दौरा आहे. त्यासाठी शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येते आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही 2018 मध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा 'पहेले मंदिर, फिर सरकार' बोललो होतो. मी प्रार्थना करेन आणि आशीर्वाद घेईन. ही भूमी राजकीय नाही, तर ती रामराज्याची भूमी आहे. देवळात गेल्यावर मागणे मागण्यापेक्षा मी आशीर्वाद घेत असतो. जे काही दिले आहे, सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याठी धन्यवाद. ही भूमी भारताच्या आस्थेची आहे. आमचे राजकारण समाजकार्यासाठी असते. हातून चांगेल कार्य व्हावे, अशी प्रार्थना करत असतो.
#WATCH | UP: Maharashtra Min Aaditya Thackeray arrives in Lucknow ahead of Ayodhya visit
"When we came for the 1st time in 2018, we said 'pehle mandir, phir sarkaar'... I'll offer prayers & receive blessings... the land is not political, it's the land of 'Ram Rajya'," he said pic.twitter.com/E8y5NSHqBJ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 15, 2022
आदित्य ठाकरेंचा आज दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे. रामलल्लाच्या दर्शनापासून ते संध्याकाळी अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर आरतीही करण्यात येईल. लखनऊमधून ते अयोध्येसाठी रवाना झालेत. दुपारी ते इस्कॉन मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. तसंच रामल्ला, हनुमान गढीचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शरयू नदी घाटावर आरती करतील.