मुंबई : 'गरज ही शोधाची जननी आहे.' कोरोना काळात ही म्हण अगदी खरी ठरली आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. यावेळी परदेशात लोकप्रिय आणि प्रचलित असलेली वर्क फ्रॉम होम ही पद्धत आपल्या देशातही रूढ होऊ लागली. आता कोरोनानंतर आयुष्य New Normal होत असताना भारतातही वर्क फ्रॉम होमचा पर्याय वर्किंग कल्चरमध्ये स्विकारला गेला आहे. Bank Of Baroda बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा पर्याय स्विकारला.
भारतात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda news) बँक आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (work from home) हा पर्याय देण्याकरता कायमस्वरुपी पॉलिसी देण्याचा विचार करत आहे. सरकारी क्षेत्रात जर हा नियम लागू झाला तर असं करणारी बँक ऑफ बडोदा ही पहिली बँक ठरेल.
बँक ऑफ बडोदाने या कामाची जबाबदारी मॅनेजमेंट कन्सल्टंसी फर्म मॅकिन्से ऍण्ड कंपनी (McKinsey & Company)ला दिलं आहे. बँक ऑफ बडोदाच्या MD आणि CEO संजीव चड्ढा यांनी कन्सल्टंसी फर्मची नियुक्ती केली आहे.
Time Of India मध्ये दिलेल्या माहितीनुसार, BOB च्या MD आणि CEO संजीव चड्ढा यांचं म्हणण आहे की, 'जर आमचे कर्मचारी घरातून काम करत असतील आणि फक्त त्यांना दोन दिवसांकरता ऑफिसला यावं लागलं. तर आम्ही ती गोष्ट कशी फॉलो करू शकतो. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना या पॉलिसी दरम्यान कशा सुविधा देऊ शकतो? याचा विचार कंपनी नवीन पॉलिसीत करत आहे.'
कोरोनाच्या काळात बँकेच्या शाखेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली होती. या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय बँकेने ठरवला आहे. त्यांच म्हणणं आहे की, आता बँकांना या परिस्थितीसाठी तयार राहायला हवं. यामुळे बँकेने ग्राहकांकरता टचपॉईंट आणि आऊटलेट वर लक्षकेंद्रीत करायचं ठरवलं आहे. बँक ऑफ बडोदा बँकेच्या शाखांची किंमत २५ हजार आहे.