मुलींच्या फेव्हरेट ‘Lakme’चं काय आहे 'या' राजकीय नेत्याशी संबंध? या मागची रंजक कहाणी तुम्हाला माहित आहे?

तुम्हाला माहिती आहे की, लॅक्मे कधी आणि का लाँच झाली?

Updated: Aug 26, 2021, 11:16 AM IST
मुलींच्या फेव्हरेट ‘Lakme’चं काय आहे 'या' राजकीय नेत्याशी संबंध? या मागची रंजक कहाणी तुम्हाला माहित आहे? title=

मुंबई : आजपासून सुमारे 70 वर्षांपूर्वी भारतात एक असे प्रोडक्ट लाँच करण्यात आले होते, जे तोपर्यंत कोणत्याही कंपनीने ग्राहकांची गरज लक्षात घेऊन बनवले नव्हते. हे प्रोडक्ट ते होते जे देशातील एका ज्येष्ठ उद्योजकाने राजकारणीच्या सांगण्यावरून बनवले होते. हे प्रेडोक्ट होते स्त्रियांच्या सौंदर्याचे.

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, ज्यांनी स्थानिक उत्पादनांची मागणी केली होती. उत्पादन करणारे उद्योगपती जेआरडी टाटा होते आणि हे प्रोडक्ट ‘Lakme’ होते.

परंतु तुम्हाला माहिती आहे की, लॅक्मे कधी आणि का लाँच झाली? याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Lakmeचा इतिहास

1952 मध्ये सुरू झालेला, Lakme ब्रँड लवकरच देशातील सर्वात यशस्वी ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला, ही कंपनी नंतर हिंदुस्तान लीव्हर लिमिटेडला  (HLL) विकली गेली, कारण जेआरडी टाटाला वाटले की, हिंदुस्तान लीव्हर लिमिटे भविष्यात त्याला अधिक चांगला न्याय देऊ शकेल.

एका सर्वेक्षणानुसार, Lakme हा भारतातील टॉप 20 विश्वासार्ह ब्रँडपैकी एक मानला जातो. परंतु तुम्हाल हे जाणून आश्चर्य वाटेल की, ब्युटी प्रॉडक्ट कंपनी तयार करण्याचा विचार देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा होता.

70 वर्षांपूर्वीची गोष्ट

सहयोगी वेबसाइट zeebiz.com च्या मते, हे घटना 1950 च्या आसपासची असावी. असे मानले जाते की, त्या काळात श्रीमंत कुटुंबातील भारतीय स्त्रिया परदेशातून सौंदर्य उत्पादने आणत असत. एक प्रकारे भारतीय रुपया परदेशात जात होता. हे जाणून, तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना कल्पना आली की, भारतीय मेकअप ब्रँड का सुरू करू नये. म्हणून त्यांनी ही कल्पना टाटायांना दिली, परंतु त्यांनी हा कधीही विचार केला नव्हता की, हा ब्रँड एक दिवस बाजारात इतका गदारोळ निर्माण करेल की, शेवटी तो एक आंतरराष्ट्रीय ब्रँड होईल.

त्या वेळी, काही स्त्रोतांद्वारे पीएम नेहरूंपर्यंतही पोहोचले होते की, महिला संघटनेची एक समस्या अशी आहे की, त्यांच्यासाठी बाजारात स्वस्त सौंदर्य उत्पादने नाहीत. अखेरीस, 1952 मध्ये, लॅक्मेने टाटा ऑइल मिल्सची उपकंपनी म्हणून कामकाज सुरू केले. वर्ष 1961 मध्ये,  Naval H. Tata यांची पत्नी सिमोन टाटा (Simone Tata) ने कंपनीला मॅनॅजिंग डिरेक्टर म्हणून जॉईन केले आणि 1982 मध्ये त्या कंपनीच्या चेयरपर्सन बनल्या.

परंतु 1996 मध्ये Tataने Lakmeला हिंदुस्थान लीव्हरला 2 हजार कोटींना विकले.