नवी दिल्ली : Jio नंतर आता Airtel ग्राहकांना मोठा धक्का आहे. देशभरातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलची सेवा विस्कळीत झाली आहे. एअरटेल सर्व्हिस डाऊन असल्याने अनेक युजर्सना इंटरनेट वापरण्यामध्ये अडथळे येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईसह उपनगरांमध्ये जिओ सेवा डाऊन झाली होती.
देशातील अनेक भागांतील लोकांनी एअरटेलची सेवा डाऊन असल्याच्या तक्रारी ट्वीट करून दाखल केल्या आहेत. इंटरनेट सेवा वापरण्यासाठी अनेकांना समस्या निर्माण होत आहे. एअरटेल नेटवर्क आउटेजमुळे ही समस्या येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या मुद्द्यावर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही समस्या देशभरात होत आहे. याचा परिणाम एअरटेल मोबाईल इंटरनेट युजर्स आणि कंपनीच्या ब्रॉडबँड आणि वाय-फाय सेवा वापरणाऱ्यांवर होत आहे. Outage ट्रॅकर downdetector ने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11.30 वाजल्यापासून इंटरनेट सेवा डाऊन आहे. काही युजर्सनी ट्वीट करून तक्रार दाखल केली आहे. कंपनीकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
काही युजर्सच्या म्हणण्यानुसार एअरटेल अॅप देखील वापरण्यामध्ये अडथळे येत आहेत. Airel कनेक्शन फाइबर इंटरनेटपासून ब्रॉडबॅण्डपर्यंत इंटरनेट सेवा वापरण्यात अडथळे येत आहेत. आता तुम्ही जर एअरटेल वापरत असाल आणि तुम्हाला समस्या असेल तर त्यासाठी ही गोष्ट कारणीभूत असू शकते.
User reports indicate Airtel is having problems since 11:34 AM IST. https://t.co/Txh31sb3Bn RT if you're also having problems #Airteldown
— Down Detector India (@DownDetectorIN) February 11, 2022