Crime News : आजकल बऱ्याच जणांना सेल्फीचं वेड लागल्याचे आपण पाहिलं असेल. सर्वांपेक्षा वेगळा सेल्फी (selfie) यावा यासाठी सर्वचजण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र याच वेडापाई एका पत्नीने आपल्या पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमध्ये (Bihar Crime) सेल्फी घेण्याच्या नादात पत्नीने पतीला पेटवून दिलं आहे. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने 22 वर्षीय महिलेने पतीला झाडाला बांधून रॉकेल ओतून पेटवून दिले आहे. पतीला मारण्यासाठी पत्नीने सेल्फी घेण्याचा बनाव रचाव होता. हल्ल्यात जखमी झालेल्या पतीला मुझफ्फरपूरच्या श्री कृष्णा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (SKMCH) दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील साहेबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासुदेवपुरसराय गावात हा सर्व प्रकार घडला आहे. मोबाईलवर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने पत्नीने पतीला झाडाला बांधून त्याच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले आहे. आगीचे लोळ पाहून आजूबाजूच्या लोकांनी तेथे धाव घेतल्याने पतीचा जीव वाचला आहे. सध्या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आगीत भाजलेल्या पतीला स्थानिक लोकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले व घटनेची संपूर्ण माहिती साहेबगंज पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र परिस्थिती पाहून साहिबगंज येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातून पतीला पुढील उपचारासाठी एसकेएमसीएच वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
पीडित पतीचे नाव शंभू कुमार असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नी छोटी कुमारी हिने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पतीने केला आहे. शंभू दिल्लीतील एका खासगी कंपनीत गार्ड म्हणून काम करत होता आणि नुकताच पत्नीने फोन केल्यानंतर तो गावी परतला आहे. या दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न होते. मात्र छोटी सुंदर आणि तीक्ष्ण तर शंभू कुमार तितकास हुशार नसल्याने त्यांच्यात वाद व्हायचे. छोटीला तिचा नवरा आवडत नव्हता, असे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी छोटीने पतीला दिल्लीहून घरी बोलावले होते. शनिवारी रात्री छोटीने सेल्फी घेण्याच्या बहाण्याने त्याला झाडाला बांधले. त्याला झाडाला बांधून छोटीने जाऊन रॉकेल आणले आणि त्याला पेटवून दिले. आग लागल्यावर शंभू ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी येऊन त्याला सोडवले. शंभूला वाचवताना आणखी दोन जण भाजले. यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांशी बोलून छोटीला अटक केली. पती-पत्नीमध्ये संबंध चांगले नव्हते. त्यामुळे त्याला मार्गावरून हटवण्यासाठी छोटीने पतीला पेटवून दिले.