नवी दिल्ली : भाजप आणि काँग्रेसमधील बंडखोरांवर पक्षाची कारवाई करण्यात आलीय. उमेदवारीमागे घेण्याचा कालावधी उलटल्यानंतरही बंडखोरी केलेल्या भाजपातील 11 जणांवर निलंबनाची कारवाई झाली तर काँग्रेसमध्ये पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 4 जणांची हकालपट्टी करण्यात आलीय. काल भाजपातील 53 आणि काँग्रेसमधील 2 बंडखोरांवर पक्षाने कारवाई केली होती.
भोपाळ भाजप कार्यालयात काल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष-प्रदेश प्रभारी विनय सहस्रबुद्धे आणि प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांची बैठक झाली. त्यात निवडणुकीत बंडखोरीमुळे होत असलेलं पक्षाचं नुकसान यावर चर्चा झाली. 26 नोव्हेंबरपर्यंत पक्ष आणखी काही बंडखोर उमेदवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करेल.
काँग्रेसने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करणाऱ्या 4 नेत्यांना पक्षातून काढून टाकलं. बालाघाटचे माजी आमदार प्रदीप जयस्वाल, वारसिवनी ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष भुवेश पटेल, बालाघाटचे जिल्हामंत्री शैलेंद्र तिवारी आणि जनपद अध्यक्ष चिंतामण नागपुरे यांची हकालपट्टी झालीय.
काल काँग्रेसमधील 2 बंडखोरांचे 6 वर्षांसाठी निलंबन झालं. भाजपात आणखी 30 आणि काँग्रेसमध्ये 12 बंडखोर निवडणुकिच्या रिंगणात आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ तारखेला संपलीय.