मुंबई : ड्रग प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुखला मोठा झटका बसला आहे. प्रसिद्ध ऑनलाईन लर्निंग ऍप Byju's च्या जाहिरात विभागाच्या चीफने शाहरुखच्या सर्व जाहिराती थांबवल्या आहेत. मुंबईत ड्रग प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यनची चौकशी सुरू आहे. आर्यनला अद्याप जामीन मिळालेला नाही. आर्यनची रवानगी ऑर्थर रोड तुरूंगात झाली आहे.
बायजूच्या जाहिराती शाहरुख खानसाठी सर्वात मोठ्या स्पॉसरशिप डिलपैकी एक आहे. यासोबतच हुंडाई, एलजी, दुबई टुरिजम, आयसीआयसीआय आणि रिलायन्स जिओसारख्या अनेक कंपन्यांच्या जाहिरातीवर शाहरुख खानचा चेहरा आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार बायजू ब्रॅंड शाहरुखला दरवर्षी 3-4 कोटी रुपये देत असते. शाहरुख 2017 पासून बायजूचे ब्रॅंड ऍंबेसडर आहेत.
शाहरुखच्या मुलाचा ड्रग प्रकरणातील वाद पाहता कंपनीला शाहरुखच्या चेहऱ्यामुळे फटका बसयला नको. म्हणून सध्या शाहरुखच्या जाहिराती बंद केल्या आहेत. परंतु शाहरुखला पूर्णतः ब्रॅडमधून काढण्यात आले की नाही याबाबत सध्या माहिती उपलब्ध नाही.
आर्यन खान आणि अन्य 7 जण मागील आठवड्यात मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया जहाजात ड्रग प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात आहेत. एनसीबीने काही जणांकडून वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले होते.