दिवाळी (Diwali) जवळ येताच खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना बोनसचे वेध लागलेले असतात. सध्या कर्मचाऱ्यांना मिठाईव्यतिरिक्त (Sweets) काही भेटवस्तूही देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कंपन्या (company) आपल्या कर्मचाऱ्यांना अशा काही भेटवस्तू देतात की त्या कायमच स्मरणात राहतात. त्या भेटवस्तूंमुळे त्या कंपनी आणि कंपनीचे मालकांची जोरदार चर्चा होते. अनेकांनाही असाच आपला बॉस (Boss) असावा अशीही इच्छा निर्माण होते. असाच एक पराक्रम चेन्नईतील (chennai) एका सराफा व्यापाऱ्याने (jewellery shop) केला आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चक्क कार (Car) आणि बाइक (Bike) भेट म्हणून दिल्या आहेत. (chennai jewellery shop owner gift car bike to staff for diwali)
चेन्नईतील एका सराफाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिल्या आहेत. चलनी ज्वेलर्सने रविवारी आपल्या 10 कर्मचाऱ्यांना कार आणि 20 कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बाईक भेट दिली. या कर्मचाऱ्यांनी चढ-उताराच्या काळातही आम्हाला साथ दिली आहे. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही भेट आहे, असे चलनी ज्वेलर्सचे मालक जयंती लाल म्हणाले. या भेटीनंतर काही कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तर काहींना आश्चर्याचा धक्का बसला
याआधी, चलनी ज्वेलरीच्या जयंती लाल चेंती यांनी त्यांच्या कर्मचार्यांना 8 कार आणि 18 बाईक दिल्या होत्या. जयंती लाल यांनी सांगितले की, "ही भेट त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी आहे. व्यवसायातील चढ-उताराच्या काळातही या कर्मचाऱ्यांनी आम्हाला साथ दिली आणि नफा मिळवण्यात मदत केली. ते केवळ कर्मचारी नाहीत तर ते आमचे कुटुंबही आहेत. असे सरप्राईज देऊन आम्हाला त्यांना आमच्या कुटुंबासारखे वागवायचे होते."
Chennai, Tamil Nadu | A jewellery shop owner gifted cars and bikes to his staff as Diwali gifts
They have worked with me through all ups and downs. This is to encourage their work. We are giving cars to 10 people and bikes to 20: Jayanthi Lal, owner of the jewellery shop (16.10) pic.twitter.com/xwUI0sgNRn
— ANI (@ANI) October 17, 2022
दरम्यान, एवढी मोठी भेट देण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी सुरतचे अब्जाधीश हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट, कार आणि इतर मौल्यवान भेटवस्तू दिल्याने बरीच चर्चा झाली होती. 2016 मध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1,260 कार दिल्या होत्या. त्यावेळी या बातमीने देशभरातील सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर, अनेक वर्षे बातम्या येत राहिल्या की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. आता चेन्नईच्या व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.