मुंबई : कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रोखण्यासाठी गरज आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत मागणी केली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळल्यामुळे लाॅकडाऊन वाढविण्याची विनंती, करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
BreakingNews । ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढवावा । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत केली मागणी । दिल्ली आणि महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळल्यामुळे लाॅकडाऊन वाढविण्याची विनंती - सूत्रांची माहिती#Lockdown @ashish_jadhao pic.twitter.com/LZVA9CS4xo
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 11, 2020
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबाबत संभ्रम आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढत राहिली आणि लॉकडाऊन उठविण्यात आले तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची गरज आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray discussing preventive measures to mitigate the spread of Coronavirus with the Hon’ble Prime Minister @narendramodi ji via video conference. pic.twitter.com/HjEge905Kh
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली आहे. तशी आमची तयारी आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे, असे सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. त्यानंतर राज्यात टप्प्या टप्याने निर्णय घेतले जात होते. देशात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आज शनिवारी करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहोचला आहे. मुंबई आणि पुण्यात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात येतील, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी दिला आहे.
तर कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने अनेक राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. ओडिशा राज्याने तर आधीच एप्रिल अखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करुन टाकले आहे. तर पंजाब सरकारनेही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये १ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.