Covid 19 : सावधान! 'या' Blood Group च्या नागरीकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

Coronavirus Precautions Tips : चीनमध्ये सापडलेल्या BF.7 व्हेरीएंटमध्ये (China BF.7 variant)  गंभीर रोगाची प्रकरणे क्वचितच आढळतात. मात्र ज्या लोकांनी प्रतिकारशक्ती खुपच कमकुवत आहे, किंवा ज्या लोकांना (कॉमोरबिडीटी) म्हणजे डायबिटीज, अस्थमा, एचआय़व्ही, कॅन्सर, ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजार आहेत.

Updated: Dec 29, 2022, 02:17 PM IST
 Covid 19 : सावधान! 'या' Blood Group च्या नागरीकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका  title=

Coronavirus Precautions Tips : चीनमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरीएंट BF.7  (China BF.7 variant) सापडल्याने संपूर्ण जगाच टेन्शन वाढलं आहे. चीनच्या या व्हेरीएंटचा धोका लक्षात घेऊन जगभरातील अनेक देशांनी पुन्हा कोविड नियमावली (covid rules) अंमलात आणायला सुरुवात केली आहे.या नियमावलीद्वारे आपआपल्या देशात कोरोना नियंत्रणात (corona) आणण्याचा प्रयत्न असणार आहेत. या सर्वात आता एक रिपोर्ट समोर आली आहे. या रिपोर्टनुसार तीन रक्तगटांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. हे रक्तगट (Blood Group) कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.  

BF.7 व्हेरीएंटचा संसर्ग कोणाला होऊ शकतो?  

चीनमध्ये सापडलेल्या BF.7 व्हेरीएंटमध्ये (China BF.7 variant)  गंभीर रोगाची प्रकरणे क्वचितच आढळतात. मात्र ज्या लोकांनी प्रतिकारशक्ती खुपच कमकुवत आहे, किंवा ज्या लोकांना (कॉमोरबिडीटी) म्हणजे डायबिटीज, अस्थमा, एचआय़व्ही, कॅन्सर, ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजार आहेत. त्यांना या व्हेरीएंटचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे असे गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनी जरा सांभाळूनच रहावे. 

कोणत्या रक्तगटांना ससर्गाचा धोका?

दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलने एक कोरोनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल हॉस्पिटलने कोरोनाच्या पहिल्या लाटेत काढला होता. एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2020 या 6 महिन्या दरम्यान रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांवर हा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात असे दिसून आले आहे की A रक्तगट, B रक्तगट आणि Rh पॉझिटिव्ह (RH+) लोकांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. 

एबीओ आणि आरएच रक्तगट एकमेकांशी जोडलेले होते. वेगवेगळ्या रक्तगटांमध्ये कोरोनाची वारंवारता असल्याचे अभ्यासात आढळून आले. यामध्ये A रक्तगटाची वारंवारता 29.93 टक्के आहे. B रक्तगटाची वारंवारता 41.8%, O रक्तगट 21.19% आणि AB रक्तगट 7.89% होती. त्यामुळे अहवालानुसार तीन रक्तगटांचे लोक आहेत ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे.

'या' रक्तगटांना धोका कमी?

आरएच फॅक्टर, जो प्रथिन आहे. लाल रक्तपेशींच्या सेल पृष्ठभागावर असू शकतो. ज्या लोकांचे रक्त यामध्ये आढळते, त्यांच्या रक्ताला आरएच पॉझिटिव्ह म्हणतात. ज्या लोकांच्या रक्तात आरएच फॅक्टर नसतो त्यांना आरएच निगेटिव्ह म्हणतात. ज्या लोकांचा रक्तगट A आणि B आहे किंवा ज्यांचे Rh पॉझिटिव्ह आहेत, त्यांना कोविड संसर्ग (covid) होण्याची जास्त शक्यता असते. दुसरीकडे, ज्या लोकांमध्ये Rh घटक नाहीत, त्यांच्यामध्ये कोरोनाचा धोका कमी असतो. फ्रंटियर्स इन सेल्युलर अँड इन्फेक्शन मायक्रोबायोलॉजी या शोधनिबंधात प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)