आधी गुरांची धडक आता टळला मोठा अपघात ; वंदे भारत एक्सप्रेससमोर विघ्न कायम

या ट्रेनमध्ये 1068 प्रवासी प्रवास करत होते

Updated: Oct 8, 2022, 06:09 PM IST
आधी गुरांची धडक आता टळला मोठा अपघात ; वंदे भारत एक्सप्रेससमोर विघ्न कायम title=

वंदे भारत (Vande Bharat express) या स्वदेशी बनावटी ट्रेनच्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. मुंबई-अहमदाबाद या वंदे भारत एक्सप्रेसला गुजरातमध्ये (gujarat)सलग दुसऱ्यांदा अपघात झाला होता. गांधीनगरहून (gandhinagar) मुंबईला (Mumbai) जात असताना कंझरी आणि आनंद स्थानकादरम्यान हा शुक्रवारी अपघात झाला. याआधी मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला रेल्वेची धडक बसली होती. (delhi varanasi Vande Bharat express escapes big accident)

त्यानंतर आता दिल्लीहून (delhi) वाराणसीला (varanasi) जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (Vande Bharat express) अचानक बिघाड झाल्याने ट्रेन रद्द करावी लागलीय. खुर्जा रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना शताब्दी एक्स्प्रेसमध्ये बसून प्रवास करावा लागला. रेल्वेच्या ट्रॅक्शन मोटरमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या गाडीने रवाना करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. रुळावर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हा दोष समोर आला आणि मोठी दुर्घटना टळली.

वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 06.00 वाजता नवी दिल्ली स्थानकातून निघाली आणि उत्तर मध्य रेल्वेच्या दादरी स्थानकावरुन 06.38 वाजता पुढे गेली. जेव्हा ट्रेन लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 146 ओलांडत होती तेव्हा तिथे काम करणार्‍या गेट मॅन शाजेबचे लक्ष ट्रेनच्या डब्यांच्या अंडर गियरवर गेले. त्याला ट्रेनच्या मागील एसएलआर कोचच्या सातव्या डब्यात काही घर्षण जाणवले. शाजेबने लगेचच ब्रेक जाम झाल्याची माहिती दिली

मिळालेल्या माहितीनुसार, अजयबपूर येथे ऑनबोर्ड TXR कर्मचार्‍यांनी 06.46 वाजता ट्रेनची तपासणी केली आणि कोच क्रमांक C-8, क्रमांक NR-188322 मध्ये ब्रेक बाइंडिंग आढळले जे TXR कर्मचार्‍यांनी वेगळे केले होते. बिघाड दुरुस्त केल्यानंतर सकाळी 07.03 वाजता ट्रेन सुटली.

ट्रेन सुटल्यावर स्टेशन मास्टर ब्रिजेश कुमार आणि पॉइंटमन ब्रिजेश कुमार यांना डंकौर स्टेशनजवळ त्याच डब्यात पुन्हा काही बिघाड जाणवला. ओएचई बंद केल्यानंतर गाडी पुन्हा दनकौर स्थानकाजवळ थांबवण्यात आली. ट्रेनच्या ट्रॅक्शन मोटरमध्ये बेअरिंग फॉल्ट असल्याचे आढळून आले. खबरदारीचे उपाय घेतल्यानंतर ट्रेनला 20 किमी प्रतितास या मर्यादित गतीने खुर्जा येथे आणण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमध्ये हलवले गेले.