मुंबई : सध्या देशातली ऑक्सिजनबाबतची स्थिती पाहता केंद्रानं मोठा निर्णय घेतलाय. 9सेक्टर वगळता 22 एप्रिलपासून सर्व उद्योगांना ऑक्सिजन सप्लाय बंद करणाय. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी याबाबत पत्र लिहून सप्लाय थांबवण्याची मागणी केलेली. अत्यावश्यक असेल त्याच औद्योगिक कारखान्यांना ऑक्सिजन सप्लाय करावा अशी मागणी त्यांनी केलेली.
"कोरोनापूर्वी, भारतात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर 1000 ते 1200 मेट्रिक टन दरम्यान होता. परंतु, 15 एप्रिल रोजी देशात 4,795 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन वापरला गेला. गेल्या काही काळापासून वैद्यकीय ऑक्सिजनची उत्पादन क्षमता वाढत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी दिली. महाराष्ट्रात 1500 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन पुरविला जाईल. दिल्लीला 350 मेट्रिक टन आणि उत्तर प्रदेशमध्ये 800 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन पुरविला जाईल असेही ते म्हणाले.
कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारांना वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी लागेल. पुरवठ्याबरोबरच मागणीही नियंत्रणात ठेवण्याची गरज असल्याचे गोयल म्हणाले. त्याचप्रकारे जर संसर्गाच्या केसेस सतत वाढत राहिल्या तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहीलं असेही ते म्हणाले. आम्ही राज्य सरकारसोबत पण त्यांना मागणीचे व्यवस्थापन करण्याची आणि त्यावर मात करण्याची गरज असल्याचे गोयल म्हणाले.
महाराष्ट्राला रेल्वेच्या माध्यमातून वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी रेल्वेनं दिलीय.. सोमवारी कळंबोलीमध्ये ही ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल होणार असून, त्याठिकाणी ऑक्सिजनचे ट्रक उतरवण्यात येणार आहेत. रेल्वेनं ट्रक उतरवण्यासाठी रॅम्पची माहिती मागवली असून रो-रो सर्व्हिसच्या माध्यमातून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. मालगाडीत ठेवलेले ट्रक, टँकर रॅम्प असलेल्या ठिकाणी उतरवले जाणार आहेत. वसईत तांत्रिक कारणामुळे रविवारी ऑक्सिजन एक्स्प्रेस येऊ शकली नाही.