नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत.
मिसा आणि शैलेश हे दोघेही सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर असून ईडीनं मिसा भारतींच्या दिल्लीतील निवासस्थानी आणि कंपन्यावर छापे मारलेत.
केंद्रीय चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी घिटोरनी, बिजवासन आणि सैनिक फार्म क्षेत्रामध्ये आज सकाळी छापे मारले.
एकूण तीन ठिकाणी छापे मारल्याचं समोर आलंय. मिसा आणि शैलेश यांच्या कंपनीने एकाच दिवसात बँकेमधून तब्बल ९० लाख रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती तपास संस्थांच्या चौकशीत समोर आलीय.
Delhi: Misa Bharti at her Ghitorni farmhouse as ED raid continues pic.twitter.com/qNsPKyzesI
— ANI (@ANI_news) July 8, 2017