मुंबई : आई... या शब्दातच सारं जग सामावलं आहे. आपल्याला जन्म देण्यापासून, संस्कार देण्यापर्यंत आणि या समाजात मानाचं स्थान मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर हीच आई आपल्याला साथ देते. आपला हात धरून स्वत: उन्हाच्या झळा सोसत आपल्या लेकराच्या डोक्यावर मात्र मायेचं छत्र धरणारी ही आई.
आईविषयी बोलावं तितकं कमीच. याच आईची महती, सध्या पंजाबमध्ये पाहायला मिळाली. जिथं मायलेकाचं अनोखं नातं दिसून आलं.
भदौर विधान सभा (Bhadaur Legislative Assembly) क्षेत्रामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांना नमवणारे Labh Singh Ugoke सध्या चर्चेत आले आहेत ते त्यांच्या आईमुळे.
उगोके गावातील एका शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी Labh Singh Ugoke हे मुख्य पाहुणे म्हणून पोहोचले होते. लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे, इथं त्यांची आई, बलदेव कौर मागील 25 वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून काम करते.
जिथं आई हातात झाडू घेऊन स्वच्छतेचं काम करते, तिथेच तिचा मुलगा मुख्य पाहुणा म्हणून येणं ही किती मोठी बाब? आपल्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचं खुद्द 'आप'च्या Labh Singh Ugoke यांच्या मातोश्रीही म्हणतात.
Punjab| AAP MLA from Bhadaur, Labh Singh Ugoke, reached a govt school in Ugoke village as Chief Guest where his mother Baldev Kaur has been working as a sanitation worker for last 25yrs
"It's a matter of great pride, I'm very happy that my son has become an MLA,"she says (05.04) pic.twitter.com/EevndNEp1z
— ANI (@ANI) April 6, 2022
मुलगा आमदार होणं ही आनंदाची बाब असणाऱ्या कौर यांनी 'झाडू' आपल्यासाठी कायमच महत्त्वाचा असल्याचंही म्हटलं. लेकाला आमदारकी मिळाली असली तरीही आपण मात्र हे काम सुरुच ठेवणार असल्याचं त्या माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या.
AAP नेते Labh Singh Ugoke यांचंही शिक्षण याच शाळेत
सूत्रांच्या माहितीनुसार आम आदमी पार्टी या पक्षाचे नेते Labh Singh Ugoke हेसुद्धा याच शाळेत शिकले. मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या उगोके यांनी भदौर सीटवरून चन्नी यांना 37550 मतांनी पराभूत केलं होतं.
Punjab | Baldev Kaur, mother of AAP's Labh Singh, who defeated Congress' Charanjit S Channi from Bhadaur in Barnala, continues to work as a sweeper at a govt school in Ugoke village. She says," 'Jhadu' is an important part of my life. I'll continue to do my duty at the school." pic.twitter.com/OuX5kIPLFr
— ANI (@ANI) March 13, 2022
2013 मध्ये ते अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाअंतर्गत काम करणाऱ्या AAP पक्षात सहभागी झाले होते.