श्रीनगर : जम्मूच्या सुंजवान आर्मी कँपवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा श्रीनगर सीआरपीएफ हेडक्वार्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सीआरपीएफने हा हल्ला हाणून पाडला.
सीआरपीएफची क्विक रिएक्शन टीमने करन नगर भागात एनकाउंटर सुरु केलं आहे. दोन्ही दहशतवाद्यांना शोधून काढलं आहे. दोन्ही बाजूने गोळीबारी होत आहे. एनकाउंटरमध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कँपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण जवानांनी त्यांचा प्रयत्न यशस्वी नाही होऊ दिला.
एके 47 सह 2 दहशतवादी सीआरपीएफ कँपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतांना चौकीवर उपस्थित जवानांनी त्यांच्यावर फायरिंग केली. त्यानंतर ते पळाले. सकाळी साडे चारच्या दरम्यान हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Jammu & Kashmir: Encounter underway at CRPF camp in Srinagar's Karan Nagar. 23 Bn CRPF engaged in firing; Visuals deferred by unspecified time pic.twitter.com/mHFf3UNHyf
— ANI (@ANI) February 12, 2018