नवी दिल्ली : १९ वर्षीय कनिष्का मोठे स्वप्न घेऊन सुवर्ण भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करत होती पण सध्या ती रुग्णालयात जीवन आणि मृत्यूच्या मध्ये आहे.
कनिष्काच्या पालकांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून धक्का मारुन प्रियकराने मारण्याचा प्रयत्न केला. कनिष्का ही दिल्ली विद्यापीठातील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. सुमारे २ महिन्यांपूर्वी, फेसबुकद्वारे, साहिल नावाच्या एका मुलाचसोबत तिची मैत्री झाली होती. त्या दोघांची मैत्री मग नंतर प्रेमात बदलली.
साहिलला भेटण्यासाठी कनिष्का नेहमी करोलबागमध्ये त्याच्या घरी येत असे. काही दिवसांपूर्वी साहिलने कनिष्काला एक मोबाईल फोन भेट दिला होता, परंतु नंतर साहिलला कनिष्का सोबत कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते.
३१ डिसेंबरला संध्याकाळी साहिलने करोलबागेमधील घरी तिला नेले. दोघे एकाच इमारतीच्या छतावर होते. कनिष्काच्या कुटुंबाने आरोप केला आहे की साहिलने गिफ्ट केलेल्या फोनचे पैसे मागितले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. कनिष्काने त्या काळात आपल्या आईला कनिष्काने फोन ही केला आणि सांगितले की साहिल तिला मारहाण करत आहे.
काही काळानंतर कनिष्काच्या कुटुंबियांना कळले की त्यांची मुलगी छतावरून खाली पडली आहे. गंभीर स्थितीत तिला करोलबागच्या बीएल कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी साहिलला अटक केली असून प्रकरणाची चौकशी करत आहेत. पण झालेला प्रकार हा अत्यंत चिंताजनक आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुलींना असंच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जाते. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत.