नवी दिल्ली : Budget 2020 साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेला अर्थसंकल्प संसदेत आणला गेला आणि या अर्थसंकल्पात केल्या गेलेल्या प्रत्येक तरतुदीविषयी जाणून घेण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली. २०२०- २१ या आर्थिक वर्षासाठी Finance minister nirmala Sitharaman केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन याच्याकडून संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी घेण्यात आली.
शनिवारी, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी म्हणून आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ही महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावण्यासाठी त्या आल्या. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाची सर्व कागदपत्र मागील वर्षीप्रमाणेत पारंपरिक अशा 'वही- खाते' स्वरुपात आणल्या. जे एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवण्यात आलं होतं.
Budget 2020 : साऱ्यांचं लक्ष लागलेल्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास जरुर वाचा
मागील वर्षापासूनच सीतारामन यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्र ब्रीफकेसमधून आणण्याची पद्धत मोडीत काढत, त्याला bahi khata 'वही- खाते'स्वरुपात आणत या साऱ्याला पारंपरिक स्वरुप देण्याचा पायंडा पाडला होता. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ८९वा अर्थसंकल्प सादर करतेवेळी करण्यात आलेला हा बदल, वही खात्याचा वापर म्हणजे पाश्चिमात्य विचारसरणीच्या गुलामगिरीतून मुक्त होणं, हा विचार वरिष्ठ अर्थ सल्लागार क्रिष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी मांडला होता.
प्राण्याच्या कातडीपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू अशा शुभ प्रसंगी वापरणं चांगलं नाही हा सीतारामन यांचा स्पष्ट विचार असल्यामुळेच त्यांनी चामजड्याच्या बॅगेऐवजी हे वही खातं लाल रंगाच्या कापडात आणण्याचं ठरवलं होतं.