Success Story In Marathi: भारतातील करोडपती उद्योजकांच्या संघर्षाच्या कथा तर अनेकांसाठी प्रेरणादायक ठरल्या आहेत. कोणी शून्यातून संपूर्ण विश्व उभं केलं आहे तर, कोणी गावातून शहरात येऊन खडतर प्रवास करत नाव कमावलं आहे. काहींनी जर कठिण काळात रस्त्यावर रात्र काढून उद्योग उभा केला आहे. आजच्या घडीला असे अनेक अरबपती उद्योजक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सस्केस स्टोरीबद्दल सांगणार आहोत. या व्यक्तीने केवळ 50 रुपयांवरुन लाखो-करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला.
देशातील दिग्गज रियल इस्टेट कंपनी सोभा लिमिटेडचे माजी संस्थापक आणि अध्यक्ष पीएनसी मेनन यांच्या खडकर प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नशीब आजमवण्यासाठी ते घरातून फक्त 50 रुपये घेऊन बाहेर पडले मात्र आज त्यांच्याकडे 10,000 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. केरळच्या पालाघाट येथील मुळ रहिवाशी असलेले पीएनसी मेनन यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. लहान असतानाच त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावले. त्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
कुटुंबाला सांभाळण्यासाठी त्यांना कमी वयातच काम करावे लागले. कामाच्या शोधात जेव्हा ते घरातून निघाले तेव्हा त्यांच्या खिशात केवळ 50 रुपये होते. त्यांनी शिक्षणही अर्ध्यातच थांबवले आणि स्थानिक दुकानात काम करण्यास सुरू केले. त्यांनी एका मुलाखतीत दावा केला होता की, मी बी.कॉम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात मला दोनदा अपयश आले. मात्र, 1990 मध्ये मेनन यांच्या करिअरला वेगळे वळण लागले. त्यांनी बांधकाम व रियल इस्टेट सेक्टरच्या क्षेत्राबाबत माहिती मिळाली व या क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबतही. तेव्हा त्यांनी या क्षेत्रातच बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. 1995मध्ये त्यांनी सोभा डेव्हलपर्सची स्थापना केली.
मेनन यांच्या उद्योगाची भरभराट व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी सोभा रियल्टीची स्थापना केली. ही कंपनी त्यांचे मीडल इस्ट ऑपरेशन सांभाळते. ओमानचे सुलतान कबूस ग्रँड मस्जिद आणि अल बुस्तान पॅलेस सारख्या वास्तुचे डिझाइन्स मेनन यांनी तयार केले आहेत. पीएनसी मेनन ब्रुनेईचे सुलतान यांचे घर डिझाइन करणारे पहिले व्यक्ती होते. त्याचबरोबर मेनन संयुक्त अरब अमिरातमध्ये प्रसिद्ध आर्किटेक्ट आहे.
विशेष बाब म्हणजे, मेनन यांच्याकडे इंटिरीयर डिझाइनची कोणतीच डिग्री नाहीये. या उद्योगात यश मिळाल्यानंतर त्यांनी ओमानसह अरब देशात त्यांच्या कंपनीचा विस्तार करण्यास सुरुवात केली. ओमान व्यतिरिक्त मेनन यांनी सोभा लिमिटेड या नावाने भारतातही एक व्यवसाय स्थापित केला आहे. ही कंपनी भारतातील 12 राज्यात काम करते. सोभा डेव्हलपर्सची मार्केट कॅप 14,100 कोटी रुपये इतकी आहे. तर, सोभा रियल्टी अखाती देशात नॉन लिस्टेड टॉप रियल इस्टेट कंपन्यांमधील एक आहे.