मुंबई : प्रेम ही भावना चिराकाल टिकणारी आहे. प्रेम एक भावना अणि अनुभव आहे. प्रेमात एक वेगळी जादू असते. असतो तो म्हणजे एकमेकांप्रती आदर आणि सन्मान शिवाय प्रेम म्हटलं की त्यात त्याग देखील आला. प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. एक Gay कपल पहिल्याचं नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडलं. जवळपास 10 वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या कपलचं नाव संजय आणि डग (Sanjay and Doug) असं आहे.
दरम्यान संजयने खुलासा केला की दोघे मॅनचेस्टर प्राइडमध्ये (Manchester Pride) भेटले होते. त्याचं ठिकाणी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एका वृत्तानुसार डकने संजयच्या परंपरेनुसार सात फेरे घेतले. डक म्हणाला, 'मला भारतीय संस्कृती फार आवडते. शिवाय वरमाळा देखील मला फार आवडते. आमच्या कुटुंबाने आमच्यासाठी वरमाळा तयार केली आहे.'
फार कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांनी आयुष्यभर साथ देण्याचं वचन एकमेकांना दिलं. आता त्यांच्या आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. डक आणि संजय सरोगसीच्या माध्यमातून पालक होणार आहेत. जी महिला त्यांच्या बाळाला जन्म देणार आहे, त्या महिलेचा फोटो दोखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
फोटो पोस्ट करत डकने कॅप्शनमध्ये 'मला पहिल्यांदा अनुभव आला की आमचं बाळ आता हालचाल करू लागलं आहे.' ही भावना आणि अनुभव मनाला आनंद देणारी आहे. आम्ही स्वतःला भाग्यशाली समजत आहोत... असं देखील डक म्हणाला.