'आपल्या दोन्ही बायकांच्या शिव्या....', आमीर खानबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर मुलगा जुनैदला वाटतीये खंत, 'मी असं...'

बॉलिवूड अभिनेता जुनैद खानने (Junaid Khan) 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) मध्ये वडील आमीर खानच्या (Aamir Khan) पूर्वाश्रमीच्या पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि रिना दत्ता (Reena Dutta) यांच्यावर कमेंट केली होती.   

शिवराज यादव | Updated: Jan 30, 2025, 04:15 PM IST
'आपल्या दोन्ही बायकांच्या शिव्या....', आमीर खानबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर मुलगा जुनैदला वाटतीये खंत, 'मी असं...' title=

बॉलिवूड अभिनेता जुनैद खानने (Junaid Khan) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'लवयापा'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान मुलाच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आमीर खानदेखील (Aamir Khan) काही ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहे. नुकतंच सलमान खानच्या 'बिग बॉस 18' च्या फायनल शोमध्येही दोघे पोहोचले होते. यावेळी जुनैदने आमीर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि रिना दत्ता (Reena Dutta) यांच्यावर कमेंट केली होती. दरम्यान एका मुलाखतीत त्याने आपल्या या कमेंटवर खंत व्यक्त केली आहे. आपण नीट वागायला हवं होतं असं तो म्हणाला आहे. 

बिग बॉसच्या सेटवर आमीर खान आणि सलमान खान यांनी आपल्या फोन अदलाबदली केला होता. यानंतर त्यांनी एकमेकांचे मेसेज, फोटोही पाहिले होते. आमीर खान यावेळी सलमानचा फोन पाहून त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल चौकशी करत होता. तर दुसरीकडे आमीरने जेव्हा सलमानला आपला फोन पाहण्यास सांगितला तेव्हा तो म्हणाला, तू दोनदा लग्न केलंस, दोनदा घटस्फोट झाला आहे त्यामुळे तुझ्या मोबाईलमध्ये पाहण्यासारखं काही नसेल. सलमान म्हणतो की, "मी तुझ्या फोनमध्ये काय पाहू? एकतर रिना किंवा किरणने तुला मेसेज केला असेल". त्यावर लगेच जुनैद कमेंट करतो की, "म्हणजे दोन दोन एक्स-वाईफच्या शिव्या तुम्ही वाचू शकता".

जुनैदने ही कमेंट करताच सर्व प्रेक्षक जोरजोरात हसले होते. मात्र आता जुनैदने त्या वक्तव्याबद्दल खंत वाटत असल्याचं म्हटलं आहे. जुनैदने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "म्हणजे ते थोडं आवाक्याबाहेर होतं. ते दोघंही फार ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यामुळे मला वाटतं मी आणखी थोडं नीट वागायला हवं होतं. ते दोघंही 40 वर्षांपासून इंडस्ट्रीत असून, जबरदस्त आहेत. त्यामुळे मी थोडं नीट वागणं अपेक्षित होतं".

आमिर खानचं पहिले लग्न 1986 मध्ये रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांना इरा आणि जुनैद खान ही दोन मुलं आहेत. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 2005 मध्ये आमिरने किरण रावशी लग्न केलं आणि या जोडप्याने सरोगसीद्वारे त्यांचा मुलगा आझादचे स्वागत केले. 15 वर्षं एकत्र राहिल्यानंतर, आमिर आणि किरण 2021 मध्ये मैत्रीपूर्णपणे वेगळे झाले. तथापि, ते आझादचे सह-पालकत्व करत आहेत आणि व्यावसायिकरित्या सहकार्य देखील करतात. आमिरने अलीकडेच किरण रावच्या दिग्दर्शनातील 'लापता लेडीज' या चित्रपटाची निर्मिती केली.