Trending GK Quiz : अभ्यासाबरोबरच सामान्य ज्ञान असणंही गरजेचं आहे. शाळा किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवले जातात. पुढच्या करियरच्या दृष्टीने हा अभ्यास महत्तावाचा असला तरी त्याचबरोबर आजच्या काळात सामान्य ज्ञान असणंही महत्त्वाचं आहे. स्पर्धात्मक परीक्षा किंवा नोकरीसाठीच्या मुलाखतीत हे अतिरिक्त ज्ञान तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. यासाठी दररोज वर्तमान पत्राचं वाचन आणि चालू घडामोडींची माहिती घ्यायला हवी. रेल्वे, बँकिंग या सारख्या परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न हमखास विचारले जातात.
हेच लक्षात घेऊन आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. प्रश्न आणि त्याची उत्तर आधीच माहित असतील तर पुन्हा एकदा उजळणी करता येईल.
प्रश्न - पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात काय आढळतं?
उत्तर - पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सीजन आढळतं.
प्रश्न - शरीराच्या कोणत्या भागात रक्त आढळत नाही?
उत्तर - डोळ्याचा एक भाग असलेल्या कॉर्नियामध्ये रक्त नसते
प्रश्न - जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त सण साजरे केले जातात?
उत्तर - जगात भारत हा असा एकमेव देश आहे, ज्या देशात सर्वाधिक सण साजरे केले जातात
प्रश्न - भारतातील कोणत्या नदीतून सोनं वाहतं असं म्हटलं जातं?
उत्तर - भारतातील स्वर्ण रेखा नदीतून सोनं वाहतं असं म्हटलं जातं.
प्रश्न - कोणत्या देशात 10 झाडं लावल्यास सरकारी नोकरी दिली जाते?
उत्तर - फिलीपीन्स हा असा एक देश आहे जिथे एका नागरिकाने 10 झाडं लावल्यास सरकारी नोकरी दिली जाते
प्रश्न - असा कोणता प्राणी आहे, ज्याला भूंकप येण्याआधीच कळतं?
उत्तर - मासा हा असा जीव आहो ज्याला भूकंप येण्याआधीच कळतं