मुंबई : सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने-चांदीचे आजचे दर जाहीर झाले आहेत. चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कॉमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याची किंमतीत 09 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सोन्याचा दर हा 47,971 रुपये आहे.
तसेच चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 262 रुपयांनी घसरण झाली आहे. 0.40 टक्के घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 64,903 रुपये नोंद झाली आहे. ऑक्टोबर 2020 नुसार गेल्या वर्षावर नजर टाकली तर सध्या तरी सोने 4 हजार रुपयांपर्यंत स्वस्त आहे. गेल्या वर्षी या दिवशी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,220 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,971 रुपये आहे. अशा स्थितीत अजूनही ४,२४९ रुपये विक्रमी पातळीपेक्षा स्वस्त विकले जात आहेत.
तुम्ही घरबसल्या सहज सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.