उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव घसरले, 24 कॅरेटचे दर जाणून घ्या!

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज काय आहेत सोन्याचे दर वाचा 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 21, 2025, 11:30 AM IST
उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव घसरले, 24 कॅरेटचे दर जाणून घ्या!
Gold Rate Today 21 feb mcx silver price drop in india check rates

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात अशीच वाढ होत राहिली तर लवकरच सोनं 90 हजारांचा पल्ला गाठेल यात काही शंका नाही. मात्र आज शुक्रवारी वायदे बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याची नोंद आहे. MCX वर सोनं आणि चांदीच्या फ्युचर्समध्ये घट झाल्यानंतर ट्रेडिंग होत आहे. मात्र सराफा बाजारात सोन्याची घोडदौड सुरूच आहे. 

MCXवर सोनं 224 रुपयांची घट होऊन 85,500 रुपयांवर ट्रेड करत आहे. या दरम्यान चांदी 415 रुपयांची घट होऊन 96,698 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली होती. काल ट्रेडिंग सेशनमध्येही 97,113 रुपयांवर चांदी स्थिरावली होती. सराफा बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं इतक्या दिवसांपासून चिंतेच्या गर्तेत अडकलेल्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 290 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घसरण झाली असून 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबद्दलच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले असल्याने गुरुवारी सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,250 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,750 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,660 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,025 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,775 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,566 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,200 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   70,200 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52,528 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 80,250 रुपये
24 कॅरेट- 87,750 रुपये
18 कॅरेट- 65,660 रुपये