Gold Silver Price on 15 february 2024 : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशावेळी सोने-चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात किंमतींमध्ये चढ-उतार झाल्याचा परिणाम हा ग्राहकांवर होत असतो. कारण अशावेळी सोने चांदी खरेदीला मोठी मागणी असते. मात्र आज सोन्या चांदीच्या किमती घसरल्या असून खरेदीदारांसाठी चांगली संधी मिळाली आहे.
जानेवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात भाव वाढले होते, पण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. अशातच लग्नसराईचा काळ सुरु असून खरेदीदारांचा कल अधिक असतो. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या पातळीवर होता. फेब्रुवारीपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीतत जोरदार बदल होत आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होत असून त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातच दिसून येत आहे.
आज (15 फेब्रुवारी ) सराफ बाजार सुरू होताच 24 कॅरेट सोन्याचा भाव 90 रुपयांनी घसरला आहे. अमेरिकन बाजारातही सोन्याचे दर अस्थिर असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील सद्यस्थिती जाणून घ्या, मुंबई-पुण्यातील आजचा भाव... आज, गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार, 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 5,705 रुपये असेल. आज प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांची घसरण दिसून आली. 10 ग्रॅम प्रति 24 कॅरेटसाठी त्याची किंमत 62,220 रुपये असेल. आज 10 ग्रॅममागे 90 रुपयांची घसरण झाली आहे. आज प्रति किलो चांदीची किंमत 74,500 रुपये असेल. चांदीच्या दरात 1 किलोनुसार 500 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत 62,070 रुपये, पुण्यात 62,070 रुपये, नागपूर 62,070 रुपयांनी विकले जाणार आहे.
तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहून ते खरेदी कराल. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी ॲप देखील वापरू शकता. 'बीआयएस केअर ॲप'द्वारे तुम्ही सोन्याती शु्द्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही ॲपच्या माध्यमातून तक्रारही करू शकता.
घरबसल्या सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवर मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.