चंदीगड : clothes wash : काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. एक काळ होता जेव्हा आपले तंत्रज्ञान खूप मागे होते, पण आता लोकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. परदेशी तंत्रज्ञानाशिवाय भारतातही टॅलेंटची कमतरता नाही. भारतीय प्रतिभेचे वलय जगभर आहे. यामध्ये आता चितकारा विद्यापीठाच्या (Chitkara University) विद्यार्थ्यांनी एक मोठा पराक्रम करुन दाखवला आहे. त्यांनी बनवलेले नवीन वॉशिंग मशीन. आता तुमचे कपडे धुण्याचे टेन्शन कमी होणार आहे.
चितकारा विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवलेल्या वॉशिंग मशीनला (Washing Machine) 80 वॉश असे नाव देण्यात आले आहे. कारण याच्या मदतीने तुमचे कपडे फक्त 80 सेकंदात स्वच्छ होतील. याच्या मदतीने तुमचे 7 किलो वजनाचे कपडे अर्धे ग्लास पाण्यात पूर्णपणे धुऊन स्वच्छ होतील.
इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी रुबेल गुप्ता हिने हे जादुई मशीन तयार केले आहे. ही सुविधा घरापासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी आहे. जेणेकरून त्यांना कपडे धुण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
आम्ही तुम्हाला सांगतो की, विद्यार्थ्यांनी बनवलेले हे वॉशिंग मशिन 27 जानेवारीला नवीन श्रेणीक सादर केले जाऊ शकते, परंतु काही हॉस्पिटल आणि बेकरीमध्ये त्याचा वापर सुरु झाला आहे. शेवटी, जेव्हा तुमचे 7 किलोचे कपडे फक्त अर्ध्या ग्लास पाण्यात स्वच्छ होतील. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचे कपडे धुवायला आवडेल.