अहमदाबाद : पाटीदार नेता हार्दिक पटेलने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची अहमदाबादमध्ये एका हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली.
या भेटीनंतर हार्दीक पटेल तोंड लपवून हॉटेल बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. गुजरात निवडणुकी संदर्भात ही चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
गुजरात निवडणुकीत पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. या समाजाला काँग्रेसकडून आरक्षणाची हमी मिळाल्यास हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा जाहीर करू शकतात, असं सांगितलं जातंय.
या भेटीवर भाजपानं टीका केली असताना काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गेहलोत यांनी हार्दिक-राहुल भेटीबाबत स्पष्ट माहिती देण्यास नकार दिलाय.