उठाव कसा करायचा, आमदारांसोबत कसे घ्याचे हे आमच्याकडून शिका. त्याचे आम्ही गुरु आहोत. एका ठिकाणी बसून आमदार इकडचे तिकडे होत नसतात. हे समजायला तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे. म्हणून असे बेताल वक्तव्य जे करतात त्यांची किव येते. हा शब्द त्यांना लागू होतो. असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
उदय सामंत यांच्याकडे 20 नाही तर 60 लोकांचा गट
उदय सामंत यांच्याकडे 20 नाही तर 60 लोकांचा गट आहे. जेव्हा 60 लोकांचा गट एक आहे तर आम्ही सर्व एकच आहोत ना. म्हणून त्याची चर्चा करण्यात काय अर्थ नाहीये. फक्त हेडलाईन कशी तरी बनावी, यांच्यामध्ये फूट आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना खळबळजनक विधान करण्याची सवय आहे. आमच्यामध्ये अशी कोणतीही घटना किंवा वादविवाद नाहीत. हे मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत
एकनाथ शिंदे यांचा स्वभाव महाराष्ट्रातील सर्व पक्षांना माहिती आहे. त्यांना एखादी गोष्ट करायची असेल किंवा बोलायची असेल तर ते जाहीर पणे बोलतात. नाराजगी असेल तर एकनाथ शिंदे साहेब हे लपून दाखवत नाहीत. ते डायरेक्ट बोलून दाखवतात. ज्यांना बोलायचं आहे त्यांना ते बोलून मोकळे होतात. म्हणून एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. त्यांनी त्यांची लढवयाची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. त्यामुळे मी नाराज आहे, आमचं हे ऐका असं नाही तर आम्हाला हे पाहिजे आम्ही हे करणार आहोत याच भूमिकेत एकनाथ शिंदे हे आयुष्यभर जगलेत आणि तिच भूमिका ते पुढे घेऊन जात आहेत.
शिरसाटांचा राऊतांवर पलटवार
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील दरे गावात जायचे. ते आता देखील जातात. ते त्यांचे गाव आहे. स्वत: च्या गावी जाणं यावरून राजकारण होत असेल तर दुर्देव आहे. संजय राऊतांना नागा साधूचे दर्शन घेयचे असेल तर त्यांनी दरे गावाला जावे. आम्ही तुमच्या सारखे शब्द वापरत नाही. त्यापेक्षा ठाकरे गटातील नेत्यांना नागा साधूकडे घेऊन जावा असं म्हणत शिरसाट यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय.