कार वेगात असतानाच Brake Fail झाल्यास गाडी कशी थांबवायची? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

Car Brake Fail : कार वेगात असेल तर अचानक ब्रेक फेल झाल्यास गाडी कशी थांबवाल?

दिक्षा पाटील | Updated: Feb 14, 2025, 07:21 PM IST
कार वेगात असतानाच Brake Fail झाल्यास गाडी कशी थांबवायची? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग title=
(Photo Credit : Social Media)

Car Brake Fail : गाडी चालवताना अशा अनेक गोष्टी आपल्या समोर येतात ज्यामुळे आपण खूप हळू किंवा विचार करत गाडी चालवतो. पण अनेकदा अचानक काही झाल्यास आपल्याला अर्जंट ब्रेक लावावा लागतो. अशा परिस्थितीत गाडीची स्पिड जर जास्त असेल तर लगेच त्यातून स्वत: ला वाचवणं कठीण होतं. महत्त्वाचं म्हणजे अशी परिस्थिती आल्यास त्यातून वाचण्यासाठी आणि विना ब्रेक लावता गाडीची स्पिड कशी कंट्रोल करायची याविषयी जाणून घेणार आहोत. या माहितीनं नक्कीच तुम्हाला मदत होईल. 

1. घाबरू नका

सगळ्यात पहिले घाबरू नका, शांत रहा, अचानक घाबरल्यानं चुकीचा निर्णय घेऊ शकतात. स्टेअरिंगला घट्ट पकडून ठेवा आणि डोक शांत ठेवा.

2. सतत ब्रेक दाबा

जर तुमच्याकडे जर हायड्रोलिक ब्रेक सिस्टम आहे. तर ब्रेकला सतत दाबल्यानं प्रेशर तयार होऊ शकतो आणि ब्रेक काम करु शकतात. 

३. हॅंडब्रेकचा योग्य वापर करा 

हॅंडब्रेक हळू-हळू खेचा, अचानक जोरात हॅंडब्रेक खेचल्यानं कार स्पिन होऊ शकते. ही पद्धती फक्त तुम्ही कमी स्पीडमध्ये असाल तरच वापरता येऊ शकते. 

४. गियर बदला (Downshift Gears)

मॅन्युअल कार हळू-हळू गियरमध्ये जा (5th → 4th → 3rd → 2nd → 1st) ऑटोमॅटिक कारमध्ये लो गियर (L) या स्पोर्ट्स मोड (S) शिफ्ट करा. जेणेकरुन इंजन ब्रेकिंग ते कारची स्पीडची कमी आहे. 

५. रस्त्याच्या कडेच्या गोष्टींचा आधार घ्या

गार्ड रेल, झाडं किंवा फुटपार्थच्या किनाऱ्याला काल हळू-हळू घासल्यानं गाडी थांबू शकते. जर हायवे मोकळा असेल ग्रेवल या मातीवाल्या भागात गेल्यानं गाडी स्लो होते. 

६. हॉर्न आणि लाइटचा वापर करा

जवळपास असलेल्या वाहण्यांना सतर्क करण्यासाठी सतत हॉर्न वाजवा आणि हेडलाइट्स फ्लॅश करा.

7. इंजन बंद करा

चालत असताना इंजन बंद केल्यानं स्टेअरिंग लॉक होऊ शकतं आणि तुमचा गाडीवरचा ताबा सुटू शकतो.  

८. ट्रॅफिकपासून लांब मोकळी जागा शोधा

शक्य असल्यास, वाहन रिकाम्या शेतात, मोकळ्या जागेत किंवा सर्व्हिस रोडवर वळव. 

९. वेळेत ब्रेक तपासत राहा

गाडीची नियमित सर्विस करा आणि ब्रेक फ्लूड, ब्रेक पॅड आणि डिस्कचा चेक करा.