हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पूजा विधीला एक वेगळे महत्त्व असते. प्राचीन काळापासून चालत येणाऱ्या या परंपरांपैकी एक म्हणजे शिवलिंगासमोर भाविक तीन वेळा टाळी वाजवतात. तुम्ही कधीही मंदिरात पूजा करताना 3 वेळाटाळी वाजवणारे लोक पाहिले आहेत का? ही एक प्राचीन परंपरा असून तिचे एक विशिष्ट कारण आहे. शिवालयात 3 वेळा टाळी वाजवल्याने महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. तर मग शिवरात्रीची पूजा करण्यापूर्वी तुम्हीदेखील जाणून घ्या यामागील कारण काय आहे?
शास्त्रानुसार,3 वेळा टाळी वाजवण्याचे वेगवेगळे अर्थ असतात. वास्तू आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, हे एका विशेष विधीचा भाग आहे.
1. पहिली टाळी
ही टाळी म्हणजे आपण मंदिरात पोहोचलो असल्याचे महादेवांना कळविण्यासाठी असते. आपण भक्तीभावाने त्यांच्यासमोर उपस्थित असल्याचा संदेश ही टाळी देते.
2. दुसरी टाळी
ही टाळी आपल्या मनोकामनांसाठी असते. आपण आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर व्यक्त करतो.
3. तिसरी टाळी
ही टाळी म्हणजे "हे महादेव, आम्ही आमच्या इच्छा तुमच्यासमोर व्यक्त केल्या, पण आमच्यासाठी योग्य काय आहे, ते तुम्हीच ठरवा" अशी प्रार्थना असते. यामध्ये महादेवावर संपूर्ण विश्वास दाखवला जातो.
शिवपुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये 3 वेळा टाळी वाजवण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
यंदाच्या महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी 2025 रोजी जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा कराल, तेव्हा बेलपत्र, गंगाजल, धतूरा किंवा अन्य पूजेचे साहित्य नसेल, तरीही फक्त शिवालयात जाऊन श्रद्धेने 3 वेळा टाळी वाजवा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. श्रद्धेने 3 वेळा टाळी वाजवायला विसरू नका. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढेल आणि महादेवांची कृपा कायम तुमच्यावर राहील.
"हर हर महादेव!"
(Disclaimer: सदर लेख पौराणिक दंतकथा आणि सामान्य ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)