अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले 'आकाचे लोक...'

आकाचे लोक आरोपीला साथ देत होते . मग ही बी टीम अॅक्टिव्ह आहे म्हणता येईल, मी याबाबत लेखी पत्र देणार आहे अशी माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 14, 2025, 04:41 PM IST
अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले  'आकाचे लोक...' title=

अजित पवारांनी मला वेळ नाकारली नाही. मी वेळ मागितली नव्हती. मला वेळ मिळाली होती मात्र मला जाता आले नाही. अजित पवार वक्तशीरपणा पाळणारे आहेत, पण तसंच काही झालेलं नाही असं भाजपा आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केलं आहे. मी परवाची वेळ मागिली होती, फक्त वेळेवर जाणं झालं नाही असं त्यांनी सांगितलं आहे. आकाचे लोक आरोपीला साथ देत होते, मग ही बी टीम अॅक्टिव्ह आहे म्हणता येईल. मी याबाबत लेखी पत्र देणार आहे असंही ते म्हणाले आहेत. 

"अद्याप मी मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांच्या पक्षाचे लोक राजीनामा मागत आहेत. कोअर टीम, अजित पवार त्यांच्या बाजूने असतील तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आमच्या भाजपाचा प्रश्न नाही. मी स्वत: अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. फक्त 
बी टीम, सी टी , डी टीम या अॅक्टिव्ह टीमने आता थांबायला हवे. मी याबाबत पत्र  लिहून माध्यमांना ते पत्र देईल. आज मी पोलीस महासंचालकांना भेटण्याचा प्रयत्न करेन," अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. 

पुढे ते म्हणाले की, "काही लोक थेट आकाला मदत करत आहे अशा पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. ही लढाई अजून बरेच दिवस चालले. जोपर्यंत आकाचे सहकारी, आका आणि ज्यांनी ज्यांनी संतोषला मारले आहे ते सगळे फाशीवर जाईपर्यंत लढा सुरू राहील". 

"काही प्रकरणात अजून कागद आलेले नाहीत. ते आले की मी नवा बॉम्ब फोडतो. कागदपत्रं आल्यानंतर अभ्यास करुन बॉम्ब फोडणार आहे.  मी 73 कोटी बाबत बोललो तिथं रस्ते सुरू झाले असे मी ऐकलं आहे. 

"मनोज जरांगे बरोबर म्हणत आहेत. सह आरोपी अजून बरेच राहिले आहेत. ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांवर कारवाई व्हायला हवी, सीडीअर तपासा. महादेव मुंडे प्रकरणात अधिकारी बदला ही माझीच मागणी होती.  त्यांनी डीवायएसपी अंबेजोगाईला तपास दिला. मी पुन्हा एसपींना फोन केला. तो माणूस योग्य नाही सांगितलं. म्हणून अधिकारी बदलला. आता महादेव मुंडेच्या पत्नीवर उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये. 16 महिने झाले आहेत. वॉईस सॅम्पल हा पोलीस तपासाचा भाग आहे," असं ते म्हणाले.