कृषिमंत्र्यांनी पीक विमा योजनेसंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. पिक विमा योजनेबद्दल सांगताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्याशी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पिक विमा देत आहोतं असं वादग्रस्त वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत या योजनेसंदर्भात योग्य निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
एक रुपयात पिक विमा ही योजना बंद होणार असल्याचा बोललं जात आहे. यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारलं असता कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पिक विमा देत आहोतं असं वादग्रस्त वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे.
सरकार एक रुपयात पिक विमा देतं याचा गैरउपयोग काही लोकांनी केला आहे. पिक विमा योजना यशस्वी व्हावी, योग्य त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. पिक विमा संदर्भात चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहे. पिक विम्यांच्या कंपन्या लुटमार करतात. सरकारला पीक विमा बंद करायचा नाही. पिक विम्यात सुधारणा करायच्या आहेत. पिक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल असंही माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.