PM Modi US Visit Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतील उद्योगपती एलन मस्क यांची भेट घेतली. यावेळी एलन मस्क यांच्यासोबत त्यांची प्रेयसी शिवोन जिलिस आणि तीन मुलंदेखील होती. ब्लेअर हाऊसमध्ये त्यांची ही भेट झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एलन मस्क यांच्या मुलांसाठी खास भेटवस्तुदेखील आणली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलन मस्क यांच्या मुलांना तीन पुस्तकं भेट म्हणून दिली होती. त्यांनी मुलांना नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे द क्रिसेंट मून, द ग्रेट आरके नारायण कलेक्शन आणि पंडित विष्णु शर्मा यांचं पंचतंत्र ही पुस्तकं दिली होती. पंतप्रधान मोदी यांनी या भेटीचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत. यात मुलं पुस्तकं वाचताना दिसत आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे की, एलन मस्कच्या कुटुंबाला भेटणं आणि अनेक विषयांवर चर्चा करुन खूप छान वाटलं.
It was also a delight to meet Mr. @elonmusk’s family and to talk about a wide range of subjects! pic.twitter.com/0WTEqBaVpT
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
रिपोर्ट्सनुसार, 2021मध्ये एलन मस्क आणि शिवोन जिलिस यांना जुळी मुलं झाली होती. शिवोन जिलिस मस्कच्या ब्रेन टेक्नोलॉजी स्टार्टअप न्यूरालिंक कंपनीमध्ये एक्झीक्यूटीव्ह म्हणून काम पाहते. अलीकडेच या जोडप्याला तिसरं बाळ झालं आहे. एलन मस्क यांना 12 मुलं आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटलं आहे की, एलन मस्क यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा आहे. यात अंतराळ, वेग, उद्योगिक आणि नवाचार यांवरही चर्चा झाली.
दरम्यान, एलन मस्क आणि त्याच्या मुलाचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दालनात तो मस्ती करताना दिसून आला. यावेळी त्याने त्याच्या वडिलांची नक्कल केली तर कधी उगाचच इकडेतिकडे पाहत माध्यमांचं लक्षही वेधलं. त्याच्या या बाललीला पाहत ट्रम्पदेखील कौतुकाने त्याच्याकडे पाहत होते.