Why USA Want To Sale F-35 To India: काही दिवसांपूर्वीच, 28 जानेवारी रोजी अमेरिकेतली अलास्कामध्ये ईल्सन एअरफोर्स बेसवर एफ 35 ए युद्ध विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे पुन्हा एकदा एफ 35 विमानांची सुरक्षा, विश्वासार्हता आणि क्षमतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित राहत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र आता अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आयोजित केलेल्या एका संयुक्त पत्रकारपरिषदेमध्ये अमेरिका भारताला एफ-35 युद्ध विमानं विकाणार आहे, अशी घोषणा केली. खरंच भारताने ही विमानं घेतली तर ही विमानं असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा सावेस होईल. मात्र दुसरीकडे एफ-35 विमानं म्हणजे भंगार असून त्यावर पैसा खर्च कामा नये असं काहींचं मत आहे. अशातच ट्रम्प हे स्वत: ही विमानं भारताला का विकू इच्छितात हे महत्त्वाचं आहे.
एफ 35 लाइटनिंग टू अमेरिकी एअरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्टिन कंपनीने विकसित केलेलं पाचव्या पिढीतील युद्धविमान आहे. ही विमानं पहिल्यांदा 2006 साली आकाशात झेपावली होती. आधुनिक तंत्रज्ञानांनी ही विमानं युक्त असली तरी त्यांच्या अपघातांचं प्रमाणही चिंता वाढवणार आहे. छोटे पंख असलेल्या डिझाइनची ही 1 हजार विमान अमेरिकेने मित्र देशांना विकली आहेत. ही विमानं इलेक्ट्रॉनिक युद्धामध्ये सर्वोत्तम आहेत. सुपरसॉनिक विमानांमध्ये इंटीग्रेटेड कम्युनिकेशनची सुविधा आहे, असं अमेरिका सांगते.
एफ 35 विमानांमध्ये बरेच दोष आढळून आलेत. 2018 पासून आतापर्यंत एफ 35 चे 12 वेळा अपघात झालेत. त्यामुळेच या विमानांची विश्वासार्हत, देखरेख आणि व्यवस्थापन हा चर्चेचा विषय असून याबद्दल ही विमान असलेले सर्वच देश चिंतेत आहेत.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये स्पेसएक्सचे मालक आणि मोदींच्या अमेरिका दौऱ्यात त्यांना भेटलेले एलॉन मस्क यांनी एका पोस्टमध्ये व्हिडीओ अपलोड करत एफ 35 वर टीका केलेली. छोटं ड्रोन आणि एफ 35 विमान एकत्र दाखवण्यात आलेला हा व्हिडीओ शेअर करत मस्क यांनी, "अजूनही काही लोक मानवांकडून चालवली जाणारी युद्धविमानं तयार करत आहेत. ड्रोनच्या युगात ही विमानं कालबाह्य झाली आहेत. यामुळे केवळ पायलेट मारले जातील. पायलेट असलेली विमानं ही मिसाईल हल्ले आणि बॉम्ब हल्ल्यांसाठी सर्वात कमी परिणामकारक ठरतात. एक ड्रोन कोणत्याही पायलेटशिवाय हे करु शकतो," असं म्हटलेलं.
Meanwhile, some idiots are still building manned fighter jets like the F-35
pic.twitter.com/4JX27qcxz1— Elon Musk (@elonmusk) November 24, 2024
अनेक अहवालांनुसार एफ 35 मधील अनेक समस्या हे विमानाची रचना गुंतागुंतीची असल्याने आहेत. या विमानात फार मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेसिंग होते. त्यामुळे वैमानिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. अनेकदा या विमानाची महत्त्वाची यंत्रणाच बंद पडते. मे 2020 मध्ये 58 व्या फायटर स्वाड्रनमधील एफ 35 विमान एग्लिन एअरफोर्स बेसवर उतरताना कोसळलं होतं. या अपघाताचं कारण वैमानिक थकलेला असल्याने केलेली चूक आहे असं नंतर समोर आलं. ऑक्सिजन सिस्टीमच्या डिझाइनमध्ये समस्या, विमानामधील गुंतागुंत आणि हेड माऊंटेड डिस्प्लेमध्ये दोष असल्याने फ्लाइट कंट्रोल सिस्टीम निकामी ठरल्याने अपघात झालेला.
अमेरिकेकेडून असा दावा केला जातो की त्याचं एफ 35 विमान हे सुपऱ फाइटर जेट आहे. हे विमान कोणत्याच रडारवर सापडणार नाही असा अमेरिकेचा दावा आहे. मागील वर्षी पेटागॉनच्या एका अहवालामध्ये, ही विमान पूर्ण अपेक्षित क्षमतेनं काम करत नाहीत असं म्हटलेलं. एफ 35 मध्ये एकूण 65 दोष असल्याचं पेटागॉनने म्हटलं आहे. अमेरिकेने ही विमानं ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅण्ड, दक्षिण कोरिया, इस्रायल, नॉर्वे आणि इटलीसहीत इतर देशांना विकली आहेत. अमेरिकेच्या वायूदलात असलेल्या सर्व एफ 35 विमानांपैकी 50 टक्क्यांहून अधिक विमान उड्डाण करण्यास लायक नाहीत.
या विमानामध्ये अनेक दोष असतानाच हे विमान दुरुस्त करण्यासाठी तब्बल 172 दिवस लागतात. मागील पाच वर्षांमध्ये एफ 35 मध्ये अनेक दोष दिसून आले आहेत. या विमानाला अपेक्षित टार्गेट पूर्ण करता आलेली नाहीत, असंही अमेरिकेच्या एका अहवालात म्हटलं आहे.
या विमानाच्या एका फेरीसाठी 36 हजार अमेरिकी डॉलर्सचा खर्च होतो. भारतीय चलनामध्ये ही रक्कम 31 लाख रुपये इतकी होते. म्हणजेच हे विमान एकदा उडवण्यासाठी 31 लाख रुपये खर्च होतात. एका विमानाची किंमत 715 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे ही विमानं पांढरा हत्ती ठरु शकतील अशी भितीही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या विमानाचं सहावं जनरेशन अमेरिका आणि चीनमध्ये वापरलं जात आहे. सातव्या जनरेशनसंबंधी काम सुरु असलं तरी भारतासोबत पाचव्या जनरेशनची डील होणार असल्याचं समजतं.
लॉकहीड मार्टिनसारख्या अनेक कंपन्या विमान अमेरिकी सरकारवर दबाव टाकत असतात. अनेक बडे नेते या व्यवहारांच्या मोबदल्यात कंपन्यांकडून पैसे घेतात. आपल्या मित्र देशांना ही विमानं विकण्यासाठी बड्या देशांकडून दबाव आणला जातो. राजकीय संबंध सुदृढ करण्यासाठी अनेकदा समोरचा देश असे व्यवहार करतो.