27 वर्षात 17 फ्लॉप अन् 2 ब्लॉकबस्टर, आता 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य

'छावा' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची बरीच चर्चा आहे. परंतु, या अभिनेत्याने 27 वर्षांच्या कारकिर्दीत फक्त 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 14, 2025, 01:01 PM IST
27 वर्षात  17 फ्लॉप अन् 2 ब्लॉकबस्टर, आता 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य title=

Chhava Movie Review : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना हा बॉलिवूड स्टार विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. त्याने 1997 मध्ये 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या कारकिर्दीत त्याला काही विशेष यश मिळाले नाही. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याच्या सध्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो विकी कौशलसोबत 'छावा' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. 'छावा' चित्रपटातील त्याचा लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्याचं सोशल मीडियावर चाहते कौतुक करत आहेत.

'हिमालय पुत्र' हा चित्रपट अक्षय खन्नाचे वडील विनोद खन्ना यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनवण्यात आला होता. परंतु, अभिनेत्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर अक्षय खन्नाचा दुसरा चित्रपट 'बॉर्डर' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधून त्याला खूप ओळख मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानंतर त्याने सलग चार फ्लॉप चित्रपट दिले. नंतर त्याने अनेक चित्रपट करून  बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. ज्यामध्ये 'हंगामा', 'ताल', 'हलचल', 'दिल चाहता है', 'गांधी माय फादर', 'रेस' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

27 वर्षांच्या कारकि‍र्दीत दोनवेळा ब्रेक 

27 वर्षांच्या कारकि‍र्दीत अभिनेता केस गळतीच्या समस्येमुळे बराच काळ घरी राहिला. त्याने एकदा नाही तर दोनदा ब्रेक घेतला. त्यानंतरही त्याने हेयर ट्रांसप्लांटचा पर्याय स्वीकारला नाही. त्याने 2000 मध्ये पहिला ब्रेक घेतला. त्यानंतर त्याने पुन्हा 2012 ते 2016 पर्यंत ब्रेकवर राहिला. ब्रेकवरून परतल्यानंतर तो अक्षय कुमार,  जॉन अब्राहम आणि वरुण धवन यांच्यासोबत 'ढिशुम' चित्रपटात दिसला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आतापर्यंत फक्त 2 ब्लॉकबस्टर

अक्षय खन्ना त्याच्या 27 वर्षांच्या कारकि‍र्दीत आतापर्यंत फक्त 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये 'बॉर्डर' आणि 'दृश्यम 2' हे चित्रपट आहेत. याशिवाय त्याने 8 एवरेज, 3 सेमी हिट चित्रपट आहेत. फक्त एकच चित्रपट हिट झाला आहे. दरम्यान, आता सर्वांच्या नजरा त्याच्या 'छावा' चित्रपटावर आहेत. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. ज्यामध्ये अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.