बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून बनवलं Reel; महिला नेटकऱ्यांना म्हणते, मला नका शिकवू...

Viral Video : डोकं ठिकाणावर आहे ना? बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसलून बनवलं Reel. नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येताच असं काहीतरी बरळली की पुन्हा नेटकऱ्यांनी तिला झापलं...   

सायली पाटील | Updated: Feb 14, 2025, 11:59 AM IST
बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून बनवलं Reel; महिला नेटकऱ्यांना म्हणते, मला नका शिकवू...  title=
Delhi, mom, toddler, viral, video, viral video, दिल्ली, व्हायरल व्हिडीओ, इंटरनेट, मराठी बातम्या, रील, Reel, instagram reel

Viral Video : इन्स्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook) किंवा युट्यूब (You Tube) सुरु केलं की अनेकदा मंडळी रील्स, शॉर्ट्सकडे वळतात आणि तासनतास मोबाईलमध्ये स्क्रोल करतात. हे व्हिडीओ पाहणाऱ्यांचा आकडा जितका मोठा आहे तितकाच किंबहुना त्याहून मोठा आकडा आहे हे व्हिडीओ बनवणाऱ्यांचा. काहीही वायफळ विषयांपासून अगदी अर्थपूर्व विषयांपर्यंत हे व्हिडीओ तयार केले जातात. पण, यातील सगळेच व्हिडीओ कौतुक करण्याजोगे नसतात ही बाबही महत्त्वाची. 
 
सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात, काही व्हिडीओ मनात असंख्य प्रश्न निर्माण करतात तर काही व्हिडीओ उगाचच पोस्ट करण्यात आले आहेत असंही वाटतं. सध्या असाच एक व्हिडीओ अनेकांच्याच Feed मध्ये दिसत असून, त्यातील दृश्य नेटकऱ्यांचं मन विचलित करत आहे. 

हा व्हिडीओ आहे एका महिलेचा जिनं म्हणे बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून हा व्हिडीओ शेअर केला आहे. इन्ट्ग्राम युजर आणि कंटेंट क्रिएटर वर्षा यादवंशीनं हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला कॅप्शन देत तिनं लिहिलं, 'सर्वांना सुप्रभात... मी एक धाडसी मुलगा असून, हे जग नव्यानं पाहतोय आणि व्हिटॅमिन डी मिळवतोय'. बाळ आईसोबत तिथं आहे असं कॅप्शन लिहित या युजरनं व्हिडीओ पोस्ट केला. पण, त्यात दिसणाऱ्या दृश्यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला. 

महिलेनं बाळाला पकडलेलं असलं तरीही तिनं गच्चीत्या कठड्यावर त्याला बसवलं आहे. त्याचे पाय कठड्यावरून खाली झुलत आहेत. जसजसा कॅमेरा फिरतो तसतसं ही महिला मुलासह नेमकी किती उंचीवर आहे हे लक्षात येतं आणि हीचं डोकं ठिकाणावर आहे ना... हाच प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात घर करतो. 

हेसुद्धा वाचा : Champions Trophy 2025 च्या सुरक्षेची 'ऐशी की तैशी' उद्घाटन सोहळ्यातच क्रिकेटप्रेमींचा हैदोस; पाकिस्तानातील Video Viral 

काही नेटकऱ्यांनी या महिलेला 'निर्दयी' म्हणत तिच्या या धाडसावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी 'ती काय करतेय हे तिला ठाऊक आहे' असं म्हणत या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. आपल्या या कृतीनं होणारा विरोध पाहता महिलेनं आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि लिहिलं, 'व्हिडीओ व्यवस्थित ऐका आणि सत्य काय आहे ते जाणून घ्या'. व्हिडीओसंदर्भात लिहिताना या महिलेनं आपण बाळाला दोन्ही हातांनी पकडलं होतं असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण, तिनं हे धाडस केलंच का? हा प्रश्न विचारणं नेटकऱ्यांनी थांबवलं नाही.