Madhubala Birthday: मधुबाला यांची आज जयंती आहे. 14 फेब्रुवारी 1933 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि 23 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांचे निधन झाले होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही घटनांचा वेध घेऊयात. मधुबाला 50-60 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र जितकं त्यांचं फिल्म करिअरची चर्चा झाली तितक्याच त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही चर्चा झाली. त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्या अगदी एकट्या पडल्या होत्या.
मधुबाला संपूर्ण आयुष्या खऱ्या प्रेमासाठी आसुसल्या होत्या. त्यांची प्रेम कहाणी आजही चर्चिली जाते. सगळ्यात पहिले त्यांचे नाव अभिनेते प्रेमनाथ यांच्यासोबत जोडले गेले होते. मात्र दोघांचे नाते फक्त 6 महिने टिकले. त्यानंतर मधुबाला या पुन्हा एकदा प्रेमात पडल्या अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांचे नाव जोडले गेले. दोघांचे नाते नऊ वर्षांपर्यंत टिकले मात्र नंतर ते वेगळे झाले.
मधुबाला यांनी नंतर किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले. मात्र त्यांच्या शेवटच्या दिवसांतही ते मधुबाला यांच्यासोबत नव्हते. किशोर कुमार यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मधुबाला यांच्यासोबत लग्न केले होते. दोघांनी चलती का नाम गाडी आणि हाफ तिकिटमध्ये एकत्र काम केले होते. दिलीप कुमार यांच्यासोबत नातं तुटल्यानंतर किशोर कुमार मधुबाला यांच्या आयुष्यात आले होते. मधुबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी धर्मदेखील बदलला होता.
मधुबाला यांना लहानपणापासूनच एक असाध्य आजार होता. वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट नावाचा आजार त्यांना होता. मात्र खूप उशीरा त्यांना या आजाराबाबत कळाले. 'बहुत दिन हुए'ची चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना आजाराबाबत कळाले. या चित्रपटाच्या सेटवर ब्रश करताना त्यांना रक्ताची उलटी झाली. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांना आजाराबाबत काळले.
मधुबालाची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खूप वेदना होत होत्या. मधुबाला उपचारांसाठी लंडनपर्यंत देखील गेल्या होत्या. यापूर्वीच त्यांना किशोर कुमार यांनी प्रपोज केलं होतं. मधुबाला यांची बहिण मधुर भूषण यांनी एका मुलाखतीत किशोर कुमार आणि मधुबालाच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.
1960 मध्ये मधुबाला यांनी लग्न केले होते. तेव्हा त्यांचे वय 27 वर्ष होतं. आजारपणामुळं त्या खूपच खचल्या होत्या. मात्र तरीही त्यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मधुबाला यांची तब्येत खूपच बिघडली आहे आणि त्यांच्याजवळ खूप कमी वेळ उरला आहे. तेव्हा किसोर कुमार यांनी तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. किशोर कुमार यांनी त्यांना मुंबईतील कार्टर रोडयेथील घरी घेऊन गेले तिथे एक नर्स आणि ड्रायव्हर त्यांच्यासोबत होते. किशोर कुमार महिन्यातून एकदा त्यांना भेटायला यायचे, असं मधुर भूषण यांनी म्हटलं होतं.
शेवटच्या घटका मोजत असताना मधुबाला डिप्रेशनमध्ये होती. एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मिरवत असलेली मधुबाला अंथरुणाला खिळली होती. शेवटच्या क्षणी ती एकटीच होती. मधुबाला यांचे वयाच्या 36व्या वर्षी निधन झाले.