Richest Area In Chhatrapati Sambhajinagar : अजिंठा आणि वेरूळ लेण्या हे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेण्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) आहेत. छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचे प्रमुख औद्योगिक केंद्र देखील आहे. छत्रपती संभाजीनगरचा झपाट्याने विकास होत आहे. जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया कोणते? इथं उद्योगपती आणि करोडपती राहतात.
महाराष्ट्रतील पहिल्या पाच शहरी भागात छत्रपती संभाजीनगरमध्ये समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र आहे. देशभरातून मोठ्या संख्येने अनेक व्यायसायिक उद्योजक व्यवसायाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाणारे ऑरिक सिटी हे ग्रीनफील्ड औद्योगिक क्लस्टर आहे. महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाचा (DMIC) अविभाज्य भाग आहे.
नागपूर आणि मुंबई दरम्यानचा 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजीनगरमधील 24 प्रमुख ठिकाणांमधून जात आहे. नियोजीत छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेसवे यामुळे या भागाला सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर पॉश एरियात अनेक बडे उद्योजक आणि श्रीमंत व्यक्ती राहतात.
सिडको परिसरातील N1 आणि N2 सर्व औद्योगिक कंपन्यांचे मालक आणि सर्व निवृत्त अधिकाऱ्यांचे आवडते ठिकाण आहे. इथं सर्व बंगलेच बंगले आहेत.
सिडको हे छत्रपती संभाजीनगरमधील सर्वोत्तम निवासी क्षेत्रांपैकी एक आहे.
कॅनॉट आणि गारखेडा हे छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया आहेत. येथे अनेक आयटी कंपन्या, रेल्वे स्थानके आणि विमानतळ यांच्या जवळ असल्याने हा परिसर निवासासाठी सर्वेत्तम पर्याय मानला जातो.
शिवाजी नगर हे एक उत्तम गुंतवणूक क्षेत्र आहे. या परिसरात अनेक गेटेड कम्युनिटीज आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उपलब्ध आहेत. समर्थ नगर, जालना रोड, वाळूज, पडेगाव, सातारा परिसर तसेच बीड बायपास रोड हे देखील संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया म्हणून ओळखले जातात.