Chhaava Movie Actor Santosh Juvekar Post : अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटानं प्रदर्शनाआधीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली असं म्हणणं गैर ठरणार नाही.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल मध्यवर्ती भूमिकेत असून, मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर हासुद्धा त्याच्यासोबत चित्रपटात स्क्रीन शेअर करत आहे. जिथं तो रायाजी यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. 'स्ट्रगलर साला' फेम संतोष जुवेकरच्या कारकिर्दीतील ही अतीव महत्त्वाची संधी असून, त्या संधीचं त्यानं सोनं केलं असंच अनेकांचं मत आहे. अशा या अभिनेत्यासाठी हा संपूर्ण चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान घडलेला प्रसंग चाहत्यांपुढे मांडताना संतोषनं ज्या उत्साहात त्याची मांडणी केली ते पाहता चाहत्यांनाही त्याच्या अनुभवाचं कुतूहल वाटलं. कारण हा तोच क्षण होता जेव्हा ऑस्करविजेत्या रहमानला संतोषनं अगदी पहिल्या रांगेतून व्यासपीठावर पाहिलं आणि याच रहमानसोबत व्यासपीठावर उभं राहण्याची संधीसुद्धा त्याला मिळाली. एका कलाकारासाठी त्याच्या कलेला, पर्यायी त्याला मिळणारी ओळख आणि कौतुकाची थाप नेमकी काय असते हेच संतोषनं इथं अनुभवलं. हा तोच क्षण होता जिथं विकी कौशल आणि संतोषमध्ये असणारं छानसं नातंही सर्वांसमोर आलं.
'काल "छावा" सिनेमाचं Music Album launch होतं. कार्यक्रम झाल्यावर सर्व team ला stage वर बोलवण्यात आलं आणि त्यात चक्क माझं नाव पुकारलं आधी विश्वासच बसत नव्हता मग महेश दादाने पाठीवर जोरात थाप मारत मला उठवलं म्हणाले" अरे जा उठ तूला बोलावलंय" काय घडतंय काही कळत नव्हतं stage वर गेलो रहमान सरांशिवाय काही दिसतच नव्हतं सरळत्यांच्या जवळ गेलो त्यांच लक्ष नव्हतं तेंव्हा आमच्या vicky भाऊंनी ते ओळखलं आणि त्यांनी मला जवळ घेऊन रेहमान सरांना हाताला धरून वळवून माझी ओळख(तशी त्यांच्या समोर फुटकळचं आहे) करून दिली vicky भाऊ i love u for this forever मी रेहमान सरांच्या चारणांना स्पर्श केलाय त्यांनी माझा हात हातात घेऊन मला शुभेच्छा दिल्यात...... आईईईईई ग!!! सगळ्या कष्टाच फळ एकदम देवानं पदरात एकाच फटक्यात घालावं आणि तेही असं भरभरून. माझ्यासाठी "छावा" सिनेमा आणि रेहमान सरांसोबत एका stage वर एका frame मधे येणं हे केवळ आणि केवळ माझ्या आई बाबांचे देवाचे आणि माझ्या राजांचे आशिर्वाद आणि आजवरच तुम्हां मायबाप प्रेक्षकांच प्रेम'.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटात विकी कौशल, संतोष जुवेकर यांच्यासह रश्मिका मंधाना, आशुतोष राणा या आणि अशा अनेक कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आहा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो आणि किती नवे निक्रम रचतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.