Valentine's Day Wedding : आज व्हॅलेन्टाइन डे आहे. व्हॅलेन्टाइन डे म्हटलं की ते प्रेमाचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं. फेब्रुवारीचा महिना सुरु झाला की प्रेमी जोडपं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या पार्टनरसोबत वेळ व्यथित करताना दिसतात. दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेन्टाइन वीक सुरु होतो आणि 14 जानेवारी रोजी संपतो. पण तुम्हाला माहितीये का की जगात असे अनेक कपल किंवा जोडपी आहेत ज्यांना व्हॅलेन्टाइनट डेच्या दिवशी लग्न करायचं असतं. तर व्हॅलेन्टाइन डेच्या निमित्तानं किती लोकं लग्न करतात याविषयी आपण जाणून घेऊया...
प्रेम यशस्वी झाल्यानंतर त्याचा सगळ्यात शेवटचा टप्पा हा कोणत्याही जोडप्यासाठी लग्न असतो. ज्यांचं प्रेम यशस्वी होतं त्यांच्यासाठी लग्न हे खूप महत्त्वाचं असतं. त्यातही अनेक जोडप्यांची इच्छा असते की त्यांनी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्तानं लग्न करावं. जेणे करून हा दिवस आणि त्यासोबत त्यांचं लग्न हे कायम लक्षात राहिल. आता असे किती टक्के लोकं आहेत ज्यांना व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्तानं लग्न करायचं आहे त्याविषयी आपण जाणून घेऊ या.
हेही वाचा : कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे उंची वाढत नाही? जाणून घ्या
एका सर्वेनुसार, कपल्सला व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी यासाठी लग्न करायचं असते की जेणे करून दरवर्षी ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हा व्हॅलेन्टाइन डे देखील साजरी करु शकतात. आता प्रश्न हा आहे की किती टक्के जोडप्यांना असं वाटते की त्यांनी व्हॅलेन्टाइन डेच्या निमित्तानं लग्न करावं. त्याविषयी दोन वर्षांपूर्वी मॅट्रोमोनियल साइट जीवनसाथीडॉटकॉमनं एक सर्वे केला होता. या सर्वेप्रमाणे 55 टक्के तरुणांना व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी लग्न करायचं असतं. मात्र, जगभरात अशा तरुणांची टक्केवारी किती आहे त्याचा आकडा अजून समोर आलेला नाही. पण व्हॅलेन्टाइन डेच्या निमित्तानं लग्न करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांची संख्या ही 6 मिलियन असते. तर फक्त अमेरिकेत या दिवशी जवळपास एकूण 2,20,000 मुलं-मुली लग्न करतात. दरम्यान, आज व्हॅलेन्टाइन डेच्या निमित्तानं सगळेच त्यांच्या प्रेमीसह वेळ कसा व्यथित करता येईल यासाठी काही तरी प्लॅन करताना दिसतात.