'हे' 4 शब्द Googleवर सर्च करताच काय होतं माहितीये? ही जादू एकदा अनुभवूनच पाहा

गूगल वेळोवेळ्या प्रकाराचे मजेदार सर्च इफेक्ट्स आणत असतो. हे गंमतीशीर शब्द सर्च केल्याने वापरकर्त्यांना एक अनोखा अनुभव मिळतो. Googleच्या अशाच काही मजेदार गुपितांबद्दल जाणून घेऊया.

Updated: Feb 14, 2025, 01:58 PM IST
'हे' 4 शब्द Googleवर सर्च करताच काय होतं माहितीये? ही जादू एकदा अनुभवूनच पाहा title=

Google Search: गूगल हा जगातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे. दररोज कोट्यवधी लोक वेगवेगळ्या गोष्टी सर्च करण्यासाठी याचा वापर करतात. आपल्याला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर मिळवता येते. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगल विश्वसनीय स्त्रोत मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की गूगलवर काही खास शब्द सर्च केल्यास तुमच्या स्क्रीनवर मजेदार आणि अजब प्रकार होतो? काहीवेळा स्क्रीन हलते, काहीवेळा विचित्र अ‍ॅनिमेशन दिसते. बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नसते.

1. Drop Bear 

जर तुम्ही गूगलवर "Drop Bear" हा शब्द टाइप करून सर्च केला, तर तुम्हाला एक छोटा अस्वल (bear) दिसेल. हा अस्वल स्क्रीनवरून खाली पडतो आणि पडताच तुमची स्क्रीन हलू लागते. हे एक मजेदार दृश्य असून स्वतः गूगलनेच तयार केले आहे.

2. Chixuclub  

"Chixuclub" हा शब्द गूगलवर सर्च करताच एक मोठा दगड स्क्रीनवरून खाली पडताना दिसतो. हा दगड पडल्यावर संपूर्ण स्क्रीन काही सेकंदांसाठी जोरात हलते. ही कृती पाहताना असे वाटते की जणू आकाशातून मोठा उल्का पृथ्वीवर आदळतोय.

हे ही वाचा: Tips and Tricks: एक नव्हे, 4 मार्गांनी पुन्हा मिळवता येतात WhatsApp वरील डिलीट केलेले फोटो

3. Dart Mission  

"Dart Mission" हा शब्द सर्च करताच तुमची स्क्रीन वाकडी होईल. सर्च केल्यानंतर एक उपग्रह डावीकडून उजवीकडे जाताना दिसतो आणि नंतर अचानक गायब होतो. त्यानंतर गूगल पेज हलकसं तिरकं होते आणि सगळं उलटं- सुलटं वाटू लागतं.

4. Last of Us  

जर तुम्ही "Last of Us" हा शब्द गूगलवर सर्च केला, तर तुम्हाला स्क्रीनच्या खाली एक मशरूम दिसेल. जर तुम्ही त्या मशरूमवर टॅप केले, तर स्क्रीनवर बुरशी वाढू लागते. तुम्ही जितक्या वेळा मशरूमवर क्लिक कराल, तितकी बुरशी वाढत जाईल. हा इफेक्ट प्रसिद्ध "Last of Us" गेम आणि त्याच्या स्टोरीशी संबंधित आहे.

तुम्ही स्वतः हे शब्द सर्च करून पाहू शकता आणि तुमच्या मित्रांना देखील हे गूगलचे रहस्य सांगू शकता. असे अनेक ईस्टर एग्ज (लपवलेले इफेक्ट्स) गूगलमध्ये आहेत. हे शोधायला आणि अनुभवायला खूप मजा येते!