मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?

Elon Musk in Shakti Mudra: एलॉन मस्कच्या हातांची ही रचना साधीसुधी नाही. या हस्तमुद्रेमागेही आहेत काही खास कारणं. माहिती वाचून भारावून जाल.   

सायली पाटील | Updated: Feb 14, 2025, 02:51 PM IST
मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?  title=
Elon Musk in Shakti Mudra while meeting pm modi

Elon Musk in Shakti Mudra: एलॉन मस्क. जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या व्यक्तिचं स्थान जवळपास अबाधित आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. विविध पृथ्वीसोबतच थेट अंतराळापर्यंतच्या क्षेत्रांमध्ये आपल्या व्यवसाय, उद्योगाची व्याप्ती वाढवणाऱ्या मस्क यांच्या श्रीमंतीचा आकडा भल्या भल्यांना गारद करणारा. अशा या एलॉन मस्क यांनी नुकतीच प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  

PM Modi अमेरिका दौऱ्यावर असतानाच मस्क आणि त्यांच्या भेटीचा योग आला. त्यावेळी मस्क यांनी सहकुटुंब मोदींची भेट घेत या भेटीदरम्यान बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. अवकाशापासून जगाच्या गतीशीलतेपर्यंतचे मुद्दे प्रकाशझोतात आसे. खुद्द मोदींनीच X च्या माध्यमातून या खास भेटीदरम्यानची काही छायाचित्र सर्वांच्या भेटीला आणली. जिथं ते स्वत: मस्क यांच्या मुलांशी संवाद साधताना दिसत आहेत. 

आश्चर्याची बाब म्हणजे मोदींनी शेअर केलेले फोटो आणि मस्क यांचे इतरही काही फोटो पाहिल्यास कोणाही व्यक्तीला भेटताना ते एक विशिष्ट हस्तरचना करतात. अर्थात हात विशिष्ट रचनेमध्ये ठेवतात. मस्कच नव्हे, तर फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर ही मंडळीसुध्या याच रचनेसह पाहायला मिळतात. 

योगसाधनेसह ध्यानधारणेमध्ये या रचनेला शक्ती हस्तमुद्रा असं म्हटलं जातं. बहुतांश भारतीय परंपरेत या मुद्रेला महत्त्वं आहे. शारीरिक आणि मानसिक उर्जा उत्तेजित करण्यासाठी ही मुद्रा मदत करते. अनेकदा धकाधकीच्या जीवनात कितीही व्यग्र आणि त्रस्त असलो तरीही काही व्यक्तींना त्यांच्या अंतर्मनाची शक्ती यातून बाहेर आणत असते. हीच शक्ती व्यक्तीला कणखरही करते असं म्हटलं जातं. 

हेसुद्धा वाचा : PM Modi यांच्या हातात गिफ्ट पाहून Elon Musk च्या मुलांनी केला कल्ला; खास क्षणांचे Photos पाहाच 

अंतर्मनाची ताकद द्विगुणित करण्यासाठी ही मुद्रा वापरली जाते. एकाग्रता वाढवण्यासाठी या मुद्रेचं महत्त्वं असून, जीवनात स्पष्टता मिळवण्यासाठी ही मुद्रा केली जाते. या मुद्रेचं नियमित पालन केल्याच तिचे परिणाम दिसू लागतात. अंतर्मनाची उर्जा ही प्रकत्येक व्यक्तीमध्ये असून, आत्मविश्वासाच्याच रुपात अनेकदा त्याची झलक पाहायला मिळते. असं म्हणतात की शक्ती मुद्रेच्या मदतीनं या च अंतर्मनाची ताकद आणखी वाढवता येते. फक्त योगी किंवा भिक्खूच नव्हे, तर सामान्य व्यक्तीसुद्धा या शक्तिमुद्रेचा अवलंब करताना दिसतात आणि मस्क हेसुद्धा त्यातलंच एक नाव. 

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खाजरजमा करत नसून तत्सम गोष्टींना प्रोत्साहन देत नाही.)