महाकाय व्हेलने तरुणाला नावेसहित गिळलं अन् नंतर...; अंगावर काटा आणणारा VIDEO तुफान व्हायरल

समुद्रात कायाकिंग करणाऱ्या एका तरुणाला व्हेलने पाण्यात अक्षरश: बुडवलं. ही सगळी घटना त्याच्या वडिलांनी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 14, 2025, 03:57 PM IST
महाकाय व्हेलने तरुणाला नावेसहित गिळलं अन् नंतर...; अंगावर काटा आणणारा VIDEO तुफान व्हायरल  title=

समुद्रात कायाकिंग करणाऱ्या एका तरुणाला व्हेलने अक्षरश: गिळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण कायाकिंग करत असताना अचानक खालून महाकाय व्हेल आली आणि त्याला पाण्यात पलटी केलं. यादरम्यान त्याचे वडील मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. व्हेल पाण्यातून बाहेर येतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने व्हेलने तरुणाला काही इजा पोहोचवली नाही. चिलीच्या पैटागोनिया येथे ही घटना घडली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. 

तरुणाचा व्हेलसोबत झालेला सामना व्हिडीओत कैद झाला असून, चर्चेचा विषय ठरला आहे. जेव्हा व्हेलने तरुणावर हल्ला केला तेव्हा काही अंतरावर त्याचे वडील मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. 

महाकाय व्हेलने बोटीसहित तरुणाला उलटवलं

असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, एड्रियन सिमकान्स आपले वडील डेल यांच्यासह मैगलन जलडमरु मध्यजवळ बहिया एल अगुइला येथे कायाकिंग करत होता. त्याचवेळी एके ठिकाणी समुद्राखालून अचानक एक महाकाय व्हेल बाहेर आली. व्हिडीओत जणू काही व्हेलने बोटीसह तरुणाला गिळलं असं दिसत होतं. व्हेल बाहेल आल्यानंतर एक मोठी लाट दिसते आणि तरुणासह बोट दिसेनाशी होते. 

वडिलांनी शूट केला व्हिडीओ

यावेळी दुसऱ्या बोटीत एड्रियनचे वडील डेल बसले होते. ते आपल्या मुलाला शांत राहण्यास आणि संयम ठेवण्यास सांगत होते. तसंच दुसरीकडे आपल्याकडील मोबाईलमधून व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. जेव्हा व्हेल तरुणासह, बोटीला आपल्या जबड्यात खेचण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा डेल ओरडत होते की, शांत राहा. ते एड्रियनला तुला काही होणार नाही असा विश्वास देत होते. यानंतर काही सेकंदात व्हेलने कोणतंही नुकसान न करता त्याला सोडून दिलं. 

'मला वाटलं आता मी मेलो'

असोसिएटेड प्रेसशी बोलताना एड्रियनने सांगितलं की, मला वाटलं आता मी मेलो. व्हेलने मला खाल्लं आहे असं मला वाटलं. जेव्हा मी वरती आलो आणि पोहू लागलो तेव्हा वडिलांनाही काहीतरी होईल अशी भीती वाटली. जर आम्ही वेळेवर किनारी पोहोचलो नाही तर काहीही होऊ शकत होतं. 

पाण्यात काही क्षण घालवल्यानंतर एड्रियन पोहून आपल्या वडिलांच्या नावेपर्यंत पोहोचला. यानंतर वडिलांनी त्याला बोटीत चढवलं. दरम्यान या घटनेनंतर तरुण धक्क्यात आहे. अखेरीस दोघे सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचले.