90 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे आताच्या सर्व अभिनेत्री फेल! सौंदर्य पाहून...

90 चे दशक हे बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि प्रतिभेचा सुवर्णकाळ होता. यावेळी अशा अनेक अभिनेत्री आल्या, ज्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही या अभिनेत्रीच्या सौंदर्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 14, 2025, 04:46 PM IST
90 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे आताच्या सर्व अभिनेत्री फेल! सौंदर्य पाहून... title=

90s Bollywood Beautiful Top Actress: आजही 90 च्या दशकाला 'सुवर्णकाळ' म्हटले जाते. आजही चित्रपटप्रेमी त्या काळाची आठवण काढतात तेव्हा त्यांना सर्वकाही परत मिळावे अशी इच्छा होते. 90 चे दशक हे बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि प्रतिभेचा सुवर्णकाळ होता. या दशकामध्ये अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही त्यांच्या सौंदर्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. 

या यादीत पहिले नाव म्हणजे 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी सौंदर्य क्वीन ऐश्वर्या राय. श्वर्या रायने 1997 मध्ये 'इरुवर' या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. अभिनेत्री 25 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत आहे. तिने 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'जोधा अकबर' आणि 'धूम 2' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आजही तिचे सौंदर्य सर्वोत्तम नायिकांपेक्षा जास्त आहे.

तर दुसऱ्या क्रमांकावर जुही चावलाचे नाव आहे. तिने 1984 मध्ये मिस इंडियाचा किताबही जिंकला. 1986 मध्ये 'सुल्तानत' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 35 वर्षांच्या कारकिर्दीत तिने 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  ज्यात 'कयामत से कयामत तक', 'हम हैं राही प्यार के', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' आणि 'डर' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 

काजोल आणि करिश्मा कपूरचाही यादीत समाविष्ट

काजोलने 1992 मध्ये 'बेखुदी' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. काजोलने 30 वर्षांच्या कारकि‍र्दीत 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'प्यार किया तो डरना क्या', 'प्यार तो होना ही था' आणि 'माय नेम इज खान' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 

करिश्मा कपूर हिचेही नाव या यादीत समाविष्ट आहे. पुरुष अभिनेत्यापेक्षा वेगळे चित्रपट निवडणारी ती तिच्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे. 1991 मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटातून तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 30 वर्षांच्या कारकिर्दीत तिने 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  ज्यात 'राजा हिंदुस्तानी', 'दिल तो पागल है' आणि 'फिजा' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.