WPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने 2023 पासून वुमन्स प्रीमियर लीगला (Women Premier League) देखील सुरुवात केली होती. यंदा या लीगचे तिसरे वर्ष असून दरवर्षी याला क्रिकेट चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. यावर्षी देखील स्पर्धेत 5 संघांचा सहभाग असून शुक्रवार 14 फेब्रुवारी पासून वुमन्स प्रीमियर लीग 2025 ला सुरुवात होत आहे. तेव्हा या स्पर्धेचे सामने क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येतील याची माहिती जाणून घेऊयात.
वुमन्स प्रीमियर लीगमध्ये यंदा 5 संघ सहभागी होणार असून यात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जाएंट्स यांचा समावेश आहे. 14 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा तिसरा सीजन 15 मार्च रोजी संपणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगचा ओपनिंग सामना बडोदरा स्टेडियमवर खेळवला जाईल. तर शेवटचा सामना हा बॉरबॉन स्टेडियमवर पार पडेल. संध्याकाळी 7: 30 वाजता या सामन्यांना सुरुवात होईल. वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सिजनचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले होते. त्यानंतर वुमन्स प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. आता यंदाच्या सीजनचा पहिला सामना 14 फेब्रुवारी रोजी हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात खेळवण्यात येईल.
वुमन्स प्रीमियर लीग 2025 च्या सर्व सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनलवर होणार असून जिओ सिनेमा अँप आणि वेबसाईटवर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवण्यात येईल.
हेही वाचा : ICC ची मोठी घोषणा, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ होणार मालामाल, उपविजेत्यांनाही मिळणार एवढे कोटी
गुजरात टायटन्स : एश्ले गार्डनर (कर्णधार), हरलीन देओल, प्रकाशिका नाइक, बेथ मूनी, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, भारती फुलमाली, लौरा वोलवार्ट, सायाली सचारे, डेनियल गिब्सन, मन्नत कश्यप, शबनम शकील, दयालन हेमलता, मेघना सिंह, सिमरन शेख, डिएंड्रा डॉटिन, फोबे लिचफील्ड, तनुजा कंवर
दिल्ली कॅपिटल्स: एलिस कैप्सी, मेग लैनिंग (कर्णधार), सारा ब्राइस, एनाबेल सदरलैंड, मिन्नू मणि, शेफाली वर्मा, अरुंधति रेड्डी, एन चरणी, शिखा पांडे, जेमिमा रोड्रिग्स, नंदिनी कश्यप, स्नेहा दीप्ति, जेस जोनासेन, निकी प्रसाद, तानिया भाटिया, मार्चिज़ैन कप्प, राधा यादव, टाइटस साधु
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु: आशा शोभना जॉय, जोशिता वीजे, ऋचा घोष, डैनी व्याट, कनिका आहूजा, सब्बीनेनी मेघना, एकता बिष्ट, केट क्रॉस, श्रेयांका पाटिल, एलिस पेरी, प्रेमा रावत, स्मृति मंधाना (कर्णधार), जॉर्जिया वेयरहैम, राघवी बिष्ट, सोफी डिवाइन, जगरवी पवार, रेणुका सिंह, सोफी मोलिनक्स
यूपी वॉरियर्स: अलाना किंग, गौहर सुल्ताना, साइमा ठाकोर, एलिसा हीली, ग्रेस हैरिस, श्वेता सेहरावत, अंजलि सरवानी, किरण नवगिरे, सोफी एक्लेस्टोन, अरुशी गोयल, क्रांति गौड़, तहलिया मैकग्राथ, चमारी अथापथु, पूनम खेमनार, उमा छेत्री, दीप्ति शर्मा (कर्णधार), राजेश्वरी गायकवाड़, वृंदा दिनेश
मुंबई इंडियन्स : अक्षिता माहेश्वरी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, अमनदीप कौर, हेले मैथ्यूज, साइका इशाक, अमनजोत कौर, जिंतीमनी कलिता, सजीवन सजाना, अमेलिया केर, कीर्तना बालाकृष्णन, संस्कृति गुप्ता, क्लो ट्रायोन, नादिन डी क्लार्क, शबनम इस्माइल, जी कमलिनी, नताली साइवर-ब्रंट, यास्तिका भाटिया