Crime News : हल्ली काळ बदला आहे, नवरा बायको कामानिमित्त घराबाहेर पडतात. त्यात गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाचा घटना वाढल्याचा पाहिला मिळत आहे. या विवाहबाह्य संबंधाचा शेवट हा अतिशय धक्कादायक आणि गुन्हेगारीकडे गेलेला अनेक घटनांमध्ये पाहिला मिळालाय. अशीच एक धक्कादायक घटना केरळमध्ये समोर आली आहे. केरळमधील अलप्पुझा इथे 54 वर्षांचे कुंजुमन आणि 50 वर्षांची अश्वम्मा हे आपल्या 28 वर्षीय किरण नावाच्या मुलासोबत गुणागोविंदाने राहत होते. मात्र त्यांच्या आयुष्यात एकादिवशी भूकंप आला.
झालं असं की, अश्वम्मा या महिलेच तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. याबद्दल तिचा नवरा आणि मुलाला समजलं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात वादळ आलं. अश्वम्मा हिच घराच्या शेजारी राहणाऱ्या 53 वर्षीय दिनेशसोबत अनैतिक संबंध होते. अनेक दिवस ही गोष्ट दोन्ही घरातील लोकांपासून लपवून होती. मात्र अश्वम्माच्या नवरा आणि मुलाला कळल्यानंतर त्यांनी दोघांना हे प्रकरण इथे थांबवण्याची ताकीद दिली. पण प्रेम आंधळ असतं असंच काय ते माहिती नाही, पण या दोघांनी कसलीही पर्वा न करता आपलं नातं तसंच सुरु ठेवलं. अश्वम्माच्या पत्नी आणि मुलाने दिनेशला तिच्यापासून लांब राहण्याची ताकीद दिली. मात्र याचा काही
अनैतिक संबंधांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. अनैतिक संबंधांचा शेवट अनेकदा दुर्दैवीच होतो. एका मध्यमवयीन विवाहित स्त्रीशी शेजाऱ्याचे अनैतिक संबंध होते. ही बाब उघड झाल्यानंतर त्या स्त्रीचा पती आणि मुलगा यांनी शेजाऱ्याला मारून टाकलं. त्यासाठी अशी योजना केली, की कोणाला संशय येऊ नये; मात्र अखेर ती घटना उघड झाली आणि आरोपींना अटक झाली. यानंतर अश्वम्माच्या मुलाचं दिनेशसोबत मोठं भांडण झालं. पण तो या अनैतिक संबंधातून माघार घ्यायला तयार नव्हता.
हा राग मनात ठेवून किरण आणि कुंजुमन याने दिनेशला मृत्यूच्या घाट उतरवण्याच ठरवलं. पण यात आपण अडकलो नाही पाहिजे यासाठी त्यांनी नीट व्यूहरचना ठरवली. दिनेशची हत्या ही अपघाती मृत्यू वाटावा यासाठी त्याने संपूर्ण प्लॅलिंग केलं. किरणला माहिती होतं, आपली आई अश्वम्माला भेटायला दिनेश कायम घराच्या मागच्या बाजूने यायचा. म्हणून त्याने याचाच फायदा घेत घराच्या पाठीमागच्या बाजूला विजेच्या तारा लावल्या जेणे करुन त्याला विजेचा धक्का बसेल. त्यांनी केलेल्या प्लॅनिंगला यश आलं दिनेश सहज त्यात अडकला. तो अश्वम्माच्या भेटीला घराच्या मागच्या बाजूने आला अन् त्याचा पाय विजेच्या तारांवर पडला आणि त्याला विजेचा धक्का बसला. या विजेचा धक्कात दिनेशचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दिनेशनचा मृतदेह त्याच्या घराच्या जवळच्या भाताच्या शेतात दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. मात्र गुन्हेगार कितीही शातिर असो, काहीतरी चूक करतो. किरनेकडूनही तशीच चूक झाली आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांच्या कसून तपासात दिनेशच्या मृत्यूचा उलगडा झाला. पोलिसांनी किरण आणि कुंजुमन यांना अटक केली.