मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’

Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

नेहा चौधरी | Updated: Feb 14, 2025, 06:01 PM IST
मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’ title=

Suresh Dhas meets Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून उठलं. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून भाजपच आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरलाय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. त्यासोबत धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर जेव्हा सुरेश धस यांनी धनजंय मुंडेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’

धनजंय मुंडे यांचं डोळाचं ऑपरेशन झालं आहे. यानंतर सुरेश धस यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुरेश धस यांनी माध्यमांनी विचारल्यानंतर आपण धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली, असं सांगितलं. संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केल्यामुळे या भेटीवरुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

त्यात काही गैर नाही. या विषयात गजब करण्यासारखे काहीच नाही. त्यांचे ऑपरेशन झाले. त्यामुळे परवा भेटलो. कोणाच्या तब्बेतेची चौकशी करणे यामध्ये काही गैर नाही. आमचा लढा सुरुच राहणार आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत अजून काही नवीन घडामोडी होणार आहे. त्यानंतर मी सर्व काही सांगणार आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याच्या प्रश्न विचारल्यानंतर धस म्हणाले की, मी त्यांचा राजीनामा मागितला नाही. त्यांच्या पक्षाचे लोकच त्यांचा राजीनामा मागे मागत आहे. त्यांचा राजीनामा घेणे, न घेणे हे अजित पवार यांच्या हातात आहे. पुढील एक दिवसांत आणखी काही नवीन मी सांगणार आहे. त्यावेळी तुम्हाला आणखी काही कळेल, असे धस यांनी म्हटले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाही. 

अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया 

तर अंजली दमानिया म्हणाल्या की, मला देखील चार ते पाच दिवसांपूर्वी असं समजलं होतं की, दोघांची भेट झाली. मात्र, मला असं सांगण्यात आलं होतं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली. पण अशी भेट झाली असेल तर फार दुर्दैवी आहे. कारण आता सुरेश धस मग त्यांच्याविरोधात लढतील की नाही? हे सर्व मला विक्षिप्त वाटतं आहे. आकाचा आका आहे वगैरे बोलत होते. आताच्या घडीला हे समोर येत असेल तर कठीण आहे. हे अतिशय चुकीचं आहे.